कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे:25 मे पूर्वी मनपा,जि.प.च्या निवडणुका होतील, महायुतीत नाराजी नाही- धनंजय महाडिक
11 hours ago
2
कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, अशी माझी नेहमीच भूमिका राहिलेली आहे. परवा पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हद्दवाढीबाबत सकारात्मक बैठक झाली. हद्दवाढीची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच शहराची हद्दवाढ होईल, असे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे. खासदार धनंजय महाडिक पुढे बोलताना म्हणाले की, 25 मे पूर्वी मनपा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील असा अंदाज त्यांनी वर्तवली आहे. तर पालकमंत्रीपदावरुन महायुतीत काहीच नाराजी नाही, सर्व जण आनंदी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल 25 फेब्रुवारीला निकाल लागेल धनंजय महाडिक म्हणाले की, साधारणपणे 25 मेच्या आधी महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात 25 फेब्रुवारीला सुनावणी आहे. त्याच दिवशी याबाबतचा निकाल येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल. महायुतीत नाराजी नाही धनंजय महाडिक म्हणाले की, पालकमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये काहीच नाराजी नाही. विरोधकांकडून ह्या चर्चा सुरू आहेत, महायुतीचे सर्वच जण आनंदी असून जनतेची कामे करण्याकडे सर्वांचा कल आहे. हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना कोल्हापूर पासून दूर असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे. पण त्यांना जवळचा जिल्ह्याची जबाबदारी मिळेल अशी अपेक्षा आहे. पालकमंत्रीपदाबाबत पक्षाचे नेते योग्य निर्णय घेत ते मुश्रीफांचा विचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूर हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक– आबिटकर प्रकाश आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर हद्दवाढीबाबत महायुती सरकार सकारात्मक निर्णय घेईल. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत सकारात्मक आहेत. स्थानिक पातळीवर हद्दवाढीस अंतर्गत विरोध होत आहे. याबाबत येत्या आठ दिवसांत सर्व लोकप्रतिनिधींची व्यापक बैठक घेण्यात येईल, असे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. हद्दवाढ करावी हीच भूमिका- मुश्रीफ दोन दिवसांपूर्वी हसन मुश्रीफांनी बोलताना म्हटले की, कोल्हापूर शहरालगतच्या गावांचा समाविष्ट करून हद्दवाढ करावी ही आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे. तथापि कोल्हापुरातील काही लोकप्रतिनिधी हद्दवाढीच्या आडवे येत आहेत, असा गौप्यस्फोट वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)