'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मते मिळवण्याचे दिवस गेले:अंबादास दानवे यांचे विधान; ठाकरेंची शिवसेना बदलली का? कार्यकर्त्यांना पडला प्रश्न
11 hours ago
2
राज्यात आता जय भवानी, जय शिवाजीचा नारा देत मते मिळवण्याचे दिवस गेलेत, असे अजब विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरेच बदलली का? असा प्रश्नही यासंबंधी कार्यकर्त्यांना पडला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्ज येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचा संवाद मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात राजकारणाची सध्या बदललेली परिभाषा समजावून सांगताना अंबादास दानवे यांनी शिवसेनेची खरी ओळख असणाऱ्या 'जय भवानी, जय शिवाजी' या नाऱ्याविषयी उपरोक्त विधान केले. सध्या राजकारणाची परिभाषा बदलली आहे. त्यामुळे आता केवळ जय भवानी जय शिवाजी म्हणत मते मिळवण्याचे दिवस गेलेत, असे ते म्हणाले. भाजप व शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे गटावर मुस्लिमांचे लांगुलचालन केले जात असल्याचे आरोप होत आहेत. त्यातच दानवे यांनी हे विधान केल्यामुळे ठाकरे गटाची अडचण होण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये डीपीडीसी बैठकीपूर्वी दानवे संतापले दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी अंबादास दानवे चांगलेच संतापल्याचे दिसून आले. पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांना बैठकस्थळी प्रवेश नाकारल्यामुळे ते संतापल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यकर्त्यांना रोखून धरण्यासाठी बैठकीत तलवारीने भांडण होणार आहे का? असा सवाल त्यांनी यासंबंधी पोलिसांना केला. शिवसेना ठाकरे गट पुन्हा सक्रिय दुसरीकडे, ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीतील हाराकिरी बाजूला ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपासूनच मुंबईतील आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना नव्या जोमाने मुंबई महापालिकेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत. याशिवाय त्यांनी राज्यभरात या निवडणुका स्वबळावर लढण्याचेही संकेत दिलेत. यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते अंग झटकून कामाला लागल्याचा दावा केला जात आहे. सुप्रीम कोर्टातील 25 फेब्रुवारीच्या सुनावणीनंतर राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. हे ही वाचा... धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडू:अजित पवारांना सर्व पुरावे दिलेत, त्यांना अजून काय पाहिजे? अंजली दमानिया यांचा घणाघात मुंबई - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे व मकोका अंतर्गत अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडमध्ये आर्थिक संबंध आहेत. यासंबंधीचे सर्व पुरावे आम्ही अजित पवारांना दिलेत. अजून त्यांना काय पाहिजे? धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा दिला नसेल तर आम्ही त्यांना तो देण्यास भाग पाडू, असे त्या म्हणाल्यात. वाचा सविस्तर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)