मंगळवेढ्यातील अवजड वाहतूक तातडीने बंद करा:आमदार आवताडे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

1 day ago 1
मंगळवेढा शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे नागरिकांचे जीव जात आहेत. ही अवजड वाहतूक तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी नगरपालिकेच्या गेट समोर मनसेचे जिल्हा समन्वयक नारायण गोवे यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह उपोषण आंदोलन केले. आमदार समाधान आवताडे व नगरपालिकेचे पक्षनेते अजित जगताप यांनी आश्वासन देत मध्यस्थी केल्यामुळे सोमवारपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले. शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे अहोरात्र अवजड वाहतूक सुरू आहे. जवळपास १५ ते २० जणांना अपघातामुळे जीव गमवावा लागला आहे. मनसेचे जिल्हा समन्वयक नारायण गोवे यांनी अवजड वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने केली. नगरपालिका प्रशासनाने यावर उपाय म्हणून पंढरपूर बायपास व मरवडे रोडवर दोन कमानी उभ्या केल्या. कमानीची ऊंची ज्यादा ठेवल्यामुळे शहरातून होणारी अवजड वाहतूक सुरूच आहे. याबाबत वारंवार तक्रार करुनही प्रशासनाने ठोस पाऊल न उचलल्याने गोवे यांनी उपोषण सुरु केले होते. रविवारी सायंकाळी आमदार आवताडे यांनी आश्वासन दिल्यानंतर मागे घेतले. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीने सील केलेले गाळे उघडण्यासाठी गाळेधारकांच्या वतीने सुरु केलेले उपोषणही न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे स्थगित करण्यात आली आहे. आंदोलन आठवड्यासाठी स्थगित करतोय ^नगरपालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाने तक्रारींची दखल न घेतल्याने उपोषण सुरू केले होते. आमदार समाधान आवताडे यांनी सोमवारपर्यंत कमानीची उंचीकमी करून शहरातील जड वाहतूक बंद करण्याचे फोनवरुन आश्वासन दिल्यामुळे मी आंदोलन सोमवारपर्यंत स्थगित केले. - नारायण गोवे, जिल्हा समन्वयक, मनसे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article