भुईकोट किल्ला सुशोभीकरण:नूतनीकरणाची लोकसेवक मावळा म्हणून नैतिक जबाबदारी, आ. आवताडे यांचे प्रतिपादन‎

1 day ago 1
मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ला सुशोभीकरण व नूतनीकरण करणे ही माझी लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा लोकसेवक मावळा म्हणून नैतिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. ते मंगळवेढ्यातील किल्ला भाग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सुशोभीकरण व नूतनीकरण कार्यारंभ सोहळ्याप्रसंगी आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला. रविवारी सकाळी प्रांताधिकारी कार्यालयात बोलत होते. सदर किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या वेळी ज्येष्ठ नेते रामचंद्र जगताप, माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, सरोज काझी, प्रांताधिकारी माळी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, तहसीलदार मदन जाधव, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे आजी-माजी अध्यक्ष पदाधिकारी आणि तालुक्यातील विविध प्रशासन विभागातील प्रशासकीय अधिकारी, सामाजिक राजकीय व सांस्कृतिक कार्यक्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि नागरिक व शिवभक्त उपस्थित होते. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी विशेष प्रयत्न करणार या वेळी आमदार आवताडे म्हणाले, सोळाव्या शतकात हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या सवंगडी मावळ्यांनी या भूमीतील गड किल्ले हे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून हिंदवी स्वराज्याची ही अस्मिता चिरंतन ठेवली होती. त्यामुळे आपल्या संतभूमीमध्ये असणारा हा गड किल्ला सुव्यवस्थित आणि पर्यटनदृष्ट्या लोकाभिमुख तसेच ऐतिहासिक विचारांचा वसा आणि वारसा जतन करण्यासाठी आपण यासाठी यापुढील काळामध्ये आणखी निधीच्या रूपाने विशेष प्रयत्न करणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article