वकिलाकडून मोठी फसवणूक:अपघात प्रकरणात पोलिसांच्या नावे 5 लाख रुपयांची खंडणी वसूल; आरोपी वकिलावर गुन्हा दाखल

1 day ago 3
पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात एका वकिलाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात प्रकरणात अडकलेल्या तरुणाच्या वडिलांकडून पोलीस, न्यायालय आणि कारागृह अधिकाऱ्यांच्या नावाखाली पैसे उकळल्याप्रकरणी ॲड. निलेश यादव (३०) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी पवनकुमार सिंघल (५०) यांचा मुलगा, जो गुडगावमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे, त्याच्यावर डिसेंबरमध्ये पुणे स्टेशन परिसरात एका महिला वाहतूक पोलिसाला कारने धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आरोपी वकिलाने विविध बहाण्यांनी फिर्यादीकडून एकूण पाच लाख रुपये उकळले. वकिलाने प्रथम मुलाच्या मित्र-मैत्रिणींना अटकेपासून वाचवण्याच्या नावाखाली दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर कारागृहातील व्हीआयपी बॅरेकसाठी ५० हजार रुपये आणि जामीन प्रक्रियेसाठी अडीच लाख रुपये वसूल केले. शिवाय न्यायाधीशांच्या मध्यस्थीसाठी १२ लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी सिंघल यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात चौकशी केली असता वकिलाने केलेली फसवणूक उघडकीस आली. यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article