Balapur Accident: शेवाळा बाळापूर रस्त्यावर कालव्यात दुचाकी पडून एक ठार

1 day ago 3

आखाडा बाळापूर (Balapur Accident) : शेवाळा ते बाळापूर रस्त्यावरील कालवा पुलावरून दुचाकी कालव्यात पडून युवकाचा मुत्यु झाला. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पोलीस व ग्रामस्थांनी (Balapur Accident) अपघात समजल्यावर तात्काळ घटनास्थळी धाव घेउन सदर युवकाला ग्रामीण रूग्णालयात हलवले परंतु रूग्णालयात आणण्याअधी तो मयत झाला आसल्याच वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जाधव यांनी सांगितले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील देवजना शेवाळा शिवारातील गुळ कारखाना येथे काम करीत आसलेले, मोरवड येथील कैलास उर्फ हनुमान आनंदराव बुरकुले वय 31वर्षे हे रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून कामाच्या ठीकाणी जात आसताना शेवाळा बाळापूर दरम्यान कालवा पुलावरून दुचाकी कालव्यात पडून त्यांचा मुत्यु झाला. (Balapur Accident) घटनास्थळी बिटप्रमुख रामदास ग्यादलवाड, राजीव जाधव, शिवाजी पवार पोलीस पथकाने भेट दिली पोलीस व ग्रामस्थांनी युवकास कालव्यातून बाहेर काढून ग्रामीण रूग्णालयात हलवले. परंतु त्यांचा मुत्यु झाला होता. सदर कालवा पुलावरून दूचाकी पडून आजपर्यंत अनेकांना जिव गमवावा लागला तर अनेक जण गंभीर जख्मी झाले. परंतु पाटबंधारे विभाग अपघात टाळण्यासाठी कालवा कड्याच्या दोन्ही बाजूला सरंक्षण कठडे बसविण्याकडे दुर्लक्ष करत आहे.

पुलावर संरक्षण कठडे बसविण्याची सातत्याने मागणी

आखाडा बाळापूर ते शेवाळा तिन कीमी अंतर रस्त्यावर कालवा आहे. येथील पुलावर मोठे कठडे नाही यामुळे आजपर्यंत येथे दुचाकी वाहन अनेक अपघात झाले अनेकांना जिव गमवावा लागले तर बरेचजण गंभीर जख्मी झाले आहेत. (Balapur Accident) पुलावर कठडे बसविण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. पाठपुरावा केलादैशोन्नती सातत्याने याबाबत सचित्र वृत्त दिले. परंतु याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होतो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article