आत्मनिर्भर, विकसित भारतासाठी तरुणाईने खेड्याकडे वळणे गरजेचे:कुलगुरू डॉ. गडाख; कृषी विद्यापीठात प्रजासत्ताक दिन साजरा
1 day ago
1
अलीकडे युवा वर्ग विशेषतः ग्रामीण भागातील तरुणाईची पावले शहराकडे वळत असून गावातील चैतन्य हरवत चालल्याचे चित्र आहे. गावातच रोजगार स्वयंरोजगाराच्या आणि शिक्षणासह औद्योगिक विकासाच्या संधी उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण होईल आणि युवा पिढीचे शहरांकडे होणारे स्थलांतर रोखता येणे शक्य होईल, असा आशावाद डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनाचे प्रसंगी विद्यापीठ मुख्यालयी जाहीर संबोधनात उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना बोलत होते. कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधनात्मक तथा विस्तार विषयक कार्यासाठीचा रोडमॅप सादर केला. याप्रसंगी मंदाकिनी गडाख, कुलसचिव डॉ. सतीश ठाकरे, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. श्यामसुंदर माने उपस्थित होते. कौशल्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याबद्दल चतुर्थश्रेणीतील कर्मचारी व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. देश सर्वार्थाने विकसित होण्यासाठी गाव खेड्यांचा शाश्वत विकास ही प्राथमिकता असून, कृषी-अकृषी विद्यापीठा सह सर्व शासकीय-निमशासकीय विभाग, सहकारी- सेवाभावी- खाजगी संस्थानी एकत्र येत गावांच्या गरजा लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे. असे झाल्यास सर्व खेड्यांमध्ये संपन्नता येईल, असेही कुलगुरू म्हणाले. विद्यापीठाच्या राष्ट्रीय मानांकनात अजून आघाडी घेण्यासाठी प्रयत्नांची गरजदेखील अधोरेखित केली. कृषि उद्योजक घडावेत शेतीचे शिक्षण घेणाऱ्या कृषी पदवीधारकांच्या स्वतःच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, कार्यकुशलतेचा व्यावसायिक वापर करून कृषि उद्योजक घडावेत. हायटेक अॅग्रीकल्चर गावोगावी स्थापत आपल्या गावाच्या शाश्वत विकासासाठी गरजेनुसार शासकीय, निमशासकीय किवा इतर विभागांची मदत घेत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात "मॉडेल व्हिलेज' निर्मिती साधताना प्राधान्याने विद्यापीठ प्रक्षेत्र अधिक आर्थिक उत्पन्नाचे स्रोत म्हणून विकसित करीत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर गावे व विद्यापीठ साकारण्याकडे प्राधान्य राहणार कुलगुरू डॉ. गडाख म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)