शरद पवार यांची नुकतीच टीव्ही ९ मराठीवर मुलाखत प्रसारीत झाली आहे. या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी 'लाडकी बहीण योजने'वर आपली प्रतिक्रिया दिली. विधानसभा निवडणुकीत 'लाडकी बहीण योजने'चा महायुतीला फायदा होणार की नाही? यावर काय म्हणाले पवार?
शरद पवार यांची नुकतीच टीव्ही ९ मराठीवर मुलाखत प्रसारीत झाली आहे. या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी ‘लाडकी बहीण योजने’वर आपली प्रतिक्रिया दिली. विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण योजने’चा महायुतीला फायदा होणार की नाही? यावर बोलताना शरद पवार म्हणाले, लाडकी बहीण म्हणजे सरकारी तिजोरीतून पैसे देणे. काही राज्यात पैसे मतांसाठी वाटतात. इथे दुसरं काय केलं. नाव गोंडस दिलं. पैसे सरकारी तिजोरीतून काढले आणि वाटप केले. लोक शहाणे आहेत. पैसे घेतात आणि दुसऱ्यांना मतदान करतात. मागच्या निवडणुकीत पाहिलं. पैसे वाटप झालं. लोकांनी पैसे घेतले पण मतदान करताना विरोधकांना दिलं. पैसे वाटण्याचा काही परिणाम झाला नाही. ज्यांनी पैसे वाटले ते पराभूत झाले. संसदीय लोकशाहीत लोक सजगपणे निर्णय होईल. पैशाने प्रयत्न होईल. थोडाबहुत फरक पडेल. पण निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल असं वाटत नाही, असे स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केले. पुढे शरद पवार असेही म्हणाले, शेवटी लाडकी बहीण योजना हे पैसे देणं आहे. विकासाची कामे काय. दुसरा मार्ग राहिला नाही. पैसे देणच हा मार्ग आहे. तो मार्ग सत्ताधाऱ्यांनी अवलंबला आहे. पण लोक त्यांना भूलणार नाही, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
Published on: Nov 15, 2024 05:43 PM