प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
:
15 Nov 2024, 2:32 pm
Updated on
:
15 Nov 2024, 2:32 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानातील लाहोर येथील नानकाना साहिब येथे गुरु नानक देव यांची 555 वी जयंती साजरी करण्यासाठी गेलेल्या राजेश कुमार या हिंदू यात्रेकरूची दरोडेखोरांनी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. लाहोरपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या मननवाला-ननकाना साहिब रोडवर बुधवारी (दि. 13) ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक सिंध प्रांतातील लरकाना शहरातील मूळ रहिवासी असलेले राजेश कुमार हे लाहोरहून ननकाना साहिबला आपल्या मित्र आणि नातेवाईकासह कारने जात होते. लाहोरपासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या माननवाला-ननकाना साहिब रस्त्यावर तीन दरोडेखोरांनी त्यांचा मार्ग अडवला. दरोडेखोरांकडे बंदुका होत्या. त्यांनी यात्रेकरूंना बंदुकीचा धाक दाखवला आणि तीन यात्रेकरूंकडून साडेचार लाख रुपये तर ड्रायव्हरकडून 10,000 रुपये हिसकावले. यादरम्यान, राजेश कुमार यांनी विरोध केल्यावर दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. बुधवारी रात्री कुमार यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुमार यांच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’ असे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी (दि. 15) गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वाचा मुख्य सोहळा गुरुद्वारा जन्मस्थान ननकाना साहिब येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भारतातील 2,500 हून अधिक शीख आणि मोठ्या संख्येने देशी-विदेशी भाविक सहभागी झाले होते.