Pusad Police action: पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

3 hours ago 1

शहर पोलीस व डीवायएसपी पथकाची कारवाई

पुसद (Pusad Police action) : पुसद विधानसभा निवडणुक २०२४ चे पार्श्वभुमीवर पोलीस ठाणे पुसद (शहर) कडुन अवैध दारुच्या साठ्यावर मोठी कारवाई.दि. १४ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन पुसद (शहर) पोलीसांना खबऱ्यांमार्फत गुप्त माहीती मिळाली की, नविन पुसद परिसरात बोरगडी रोडच्या परमेश्वर ब्रिजलाल जयस्वाल, वय अंदाजे ५५ वर्षे, रा. नविन पुसद यांचे घरात अवैधरीत्या देशी दारुचा साठा विक्रीकरीता करुन ठेवलेला आहे.

अशा मिळालेल्या माहीतीवरुन सदर घराची घरझडती घेवुन कायदेशीर कारवाई करण्याकरिता (Pusad Police action) पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, ASP तथा SDPO हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे पुसद (शहर) चे ठाणेदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर व त्यांचे पथक स.पो.नि. धिरज बांडे, स.पो.नि. निलेश देशमुख, स.पो.नि. प्रेमकुमार केदार, पो.उप.नि. किशोर खंडार, पो.उप.नि. नगीना बी. शेख, पो.हे.कॉ. जलाल शेख, पो.हे.कॉ. गजानन पोले, पो.ना. दिनेश सोळंके, पो.कॉ. नितेश भालेराव, पो.कॉ. विशाल दातीर, महिला पो.ना. शितल चक्रनारायण, चालक पो.ना. सुनिल ठोंबरे,पोलीस कॉन्स्टेबल मनोज कदम यांनी शासकीय पंचासमक्ष परमेश्वर ब्रिजलाल जयस्वाल यांच्या नविन पुसद परिसरातील घरी जावुन दारुबाबत कायदेशीर घराची झडती घेतली.

घरामधील पुर्वेकडील एका रुममध्ये भींतीलगत देशी दारु बॉबी संत्रा चे १७० खोके (बॉक्स) प्रत्येक खोक्यामध्ये देशी दारु बॉबी संत्रा ९० मि.ली. च्या १०० बॉटल, प्रत्येकी नग किंमत ३५/- रुपये प्रमाणे एका खोक्यामध्ये ३५००/- रुपयाच्या बॉटल असा एकुण ५,९५,०००/- रुपयाचा देशी दारुचा मुद्देमाल अवैधरीत्या घरात साठवणुक केलेला मिळुन आला तसेच आरोपीने गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा एकुण ७,९५,०००/- रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. (Pusad Police action) पोलीस ठाणे पुसद (शहर) कडुन आगामी विधानसभा निवडणुक संबंधाने अवैध दारु, अवैध गुटखा यावर कारवाई करण्यात आलेली असुन त्यामध्ये ही अवैध दारुची मोठी कारवाई पोलीसांकडुन करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी पोलीस ठाणे पुसद (शहर) येथे स.पो.नि. धिरज बांडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. निलेश देशमुख हे करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article