कमला हॅरिस, ऋषी सुनक आणि आता षणमुगरत्नम, जगाच्या राजकारणात भारतीयांचा दबदबा

2 hours ago 1

जगाच्या राजकारणात सध्या भारतीय वंशाचे असे अनेक लोकं आहेत. ज्यांचा दबदबा दिसून येत आहे. अमेरिका, ब्रिटननंतर आता सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे व्यक्ती सर्वोच्च स्थानावर पोहोचले आहेत. थर्मन षणमुगररत्नम यांनी सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याने, जगातील महत्त्वाच्या राजधान्यांमध्ये राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय वंशाच्या नेत्यांच्या लांबलचक यादीत ते सामील झाले आहेत. शुक्रवारी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत षणमुगरत्नम यांना ७०.४ टक्के मते मिळाली. सिंगापूरच्या जनतेने निर्णायक फरकाने थर्मन षण्मुगररत्नम यांना त्यांचा पुढचा अध्यक्ष म्हणून निवडले आहे, असे म्हणत पंतप्रधान ली ह्सियन लूंग यांनी शनिवारी थर्मन यांचे अभिनंदन केले.

थर्मन हे भारतीय वंशाच्या नेत्यांपैकी एक

ज्यांनी जागतिक स्तरावर सार्वजनिक सेवेला सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहे. त्यांचा विजय जगभरातील भारतीयांच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक आहे. अमेरिकेतील भारतीय-अमेरिकन समुदायाचा वाढता प्रभाव देशाच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती बनलेल्या कमला हॅरिस यांच्या यशामध्ये दिसून येतो. 2017 ते 2021 पर्यंत त्या कॅलिफोर्नियाच्या खासदार होत्या. कमला हॅरिस यांनी 2011 ते 2017 पर्यंत कॅलिफोर्नियाचे ऍटर्नी जनरल म्हणूनही काम केले आहे.

कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये भारतीय आणि जमैकन पालकांमध्ये झाला. कॅलिफोर्नियातील प्रख्यात राजकारणी हरमीत ढिल्लन यांनी अलीकडेच रिपब्लिकन नॅशनल कमिटी (RNC) च्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली. निक्की हेली आणि विवेक रामास्वामी यांसारख्या भारतीय वंशाच्या नेत्यांनी 2024 मध्ये व्हाईट हाऊससाठी आपला दावा सादर केला आहे.

ऋषी सुनक हे गेल्या वर्षी ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनले. ते 210 वर्षांच्या इतिहासातील सर्वात तरुण ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. ते ब्रिटनचे पहिले हिंदू पंतप्रधान देखील आहेत. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे देखील भारतीय वंशाचे आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article