टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर जोहान्सबर्ग येथे चौथ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात 135 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 284 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेला धड 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 18.2 ओव्हरमध्ये 148 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिका 3-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. संजू सॅमसन आणि आणि तिलक वर्मा हे दोघे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 283 धावा केल्या. अभिषेक शर्मा 36 धावांवर बाद झाला. त्यानंतर संजू आणि तिलक या दोघांनी 210 धावांची नाबाद भागीदारी केली. संजूने 56 चेंडूत 9 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 109 धावा केल्या. संजूच्या कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं. तर तिलकने 47 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 9 फोरसह नॉट आऊट 120 रन्स केल्या. तिलकचं हे एकूण आणि सलग दुसरं शतक ठरल. तर दक्षिण आफ्रिकेकडून लुथो सिपामला याला एकमेव विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग
विजयी धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्स 43, डेव्हिड मिलर 36, मार्को जान्सेन नॉट आऊट 29 आणि गेराल्ड कोएत्झी याने 12 धावा केल्या. या चौघांलव्यतिरिक्त इतर सर्व फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्थी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या, रमनदीप सिंह आणि रवी बिश्नोई या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.