न्यायप्रविष्ट नोटिफिकेशन येत नसेल तर पाठवणार नोटीस:पक्ष चिन्हावरून सुप्रिया सुळेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला इशारा
1 hour ago
1
अजित पवारांच्या पक्षाच्या चिन्हाखाली न्यायप्रविष्ट असे नोटिफिकेशन येत नसेल, तर मला सांगा. मी त्यांना कोर्टामार्फत नोटीस पाठवते, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घडाळ्याचे चिन्ह अजित पवारांचे नाही, त्यांचा राष्ट्रवादी पक्षावर दावा नाही, असेही त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांची अहिल्यानगर येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने अजित पवारांची सर्वांत मोठी बदनामी केल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. भाजपने आधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्या चौकशीची मागणीही भाजपनेच केली. अदृश् शक्तीने अजित पवारांच्या साखर कारखान्यावर ईडीची नोटी पाठवली. अजित पवारांची बदनामी भाजपनेच केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांवर कधीही कोणतेच आरोप केलेले नाही. शरद पवारांनी अजित पवारांना चार वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनवले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. कर्जत-जामखेडमध्ये घडलेला प्रकार दुर्दैवी असून गलिच्छ
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारसभेत राम शिंदे आणि भाजप नेते पाशा पटेल यांनी रोहित पवारांना शिवीगाळ करत अश्लील हावभाव केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराचा सुप्रिया सुळे यांनी निषेध केला. हे अतिशय दुर्दैवी असून गलिच्छ असून सुसंस्कृत महाराष्ट्रात असे भाषण केले जात असल्याचे मला आश्चर्य वाटत आहे. भाजप हा ओरिजनल सुसंस्कृत पक्ष होता. आता हा दुसरा भाजप झाला आहे. शिवीगाळ करणार भाजप हा ओरिजनल भाजप नसल्याचे टीका सुप्रिया सुळे यांनी केली. आमची लढाई भाजपविरुद्ध
आमची लढाई कुठल्या व्यक्तीविरुद्ध नाही तर भाजप या पक्षाविरुद्ध आहे. आमच्या विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. मागच्या निवडणुकीतही भाजपने अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांनाच स्वतः सोबत घेतले, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. हे ही वाचा... शिक्षक नावाला कलंक असलेले तीन गनंग..:रोहित पवार यांची राम शिंदेंसह भाजप नेत्यांवर टीका, सोशल मिडीयावर पोस्ट केला व्हिडिओ शिक्षक पिढी घडवत असतात. पण यातले तीन कथिक प्राध्यापक आणि एक नेता... यांची ही सुसंस्कृत भाषा बघा. या ठगांची ही भाषा ऐकून यांच्या घरच्या आई-बहिणींनाही लाज वाटली असेल, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते प्रा.राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा... व्होट जिहाद विरोधात धर्मयुद्ध लढावे लागेल:मतांसाठी मविआचे नेते उलेमानचे तळवे चाटत आहेत, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या व्हिडिओवरून भाजप आक्रमक झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडकवासला येथील प्रचारसभेत नोमानी यांचा व्हिडिओ ऐकवत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. देशाला अस्थिर करण्याचे काम सुरू असून महाविकास आघाडी त्यांच्यासोबत सामील झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. आता एक राहिलो तरच सेफ राहू असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सभेमध्ये एक है तो सेफ है...चा नारा दिला. पूर्ण बातमी वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)