पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेमकुमार शुक्ला Pudhari Photo
Published on
:
15 Nov 2024, 5:33 pm
Updated on
:
15 Nov 2024, 5:33 pm
नागपूर : महाविकास आघाडी पर्यायाने विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे मुद्देच नाहीत, रडण्याशिवाय, अडीच वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी घोटाळ्यांशिवाय काहीच केलेले नाही, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेमकुमार शुक्ला यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणतात पक्ष फोडला, शरद पवार म्हणतात पक्ष फोडला. दुसरे रडगाणे म्हणजे हेलिकॉप्टर चेक केले. वास्तविक महाविकास आघाडीकडे अडीच वर्षे सत्ता होती. अडीचशे कोटी रुपयांचा कोरोना घोटाळा, खिचडी, किट घोटाळा, कोरोना औषधे घोटाळा करण्याशिवाय दुसरे केले काय? उलट भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने विकासकामे केलीत.
काँग्रेस, महाआघाडीचा व्होट जिहादवर फोकस आहे. उलेमा कौंसिलने १७ सूत्री मागण्या महाविकास आघाडीला सादर केल्या ज्या नाकारण्याचे धाडस त्यांनी केले नाही. २०१२ नंतर कारागृहात असलेल्या मुस्लिम कैद्यांना दोषमुक्त करण्याची एक मागणी आहे. व्होट जिहादच्या दबावात, उलेमाच्या दबावात दाऊद, छोटा शकिल, जिहादी, दहशतवाद्यांना मुक्त करायचे का? भाजपा यास कधीही मंजुरी देणार नाही.
महाविनाश आघाडी धर्माच्याआधारे आरक्षण देऊ इच्छिते, भाजपा असे काहीही होऊ देणार नाही. प्रवक्ते चंदन गोस्वामी, अजय पाठक, संजय सिन्हा, ऋषिकेश ठाकूर, नितीशसिंह पत्रकार परिषदेला उपस्थित होते.