भाजपच्या काळात उद्योगपती सेफ अन् मुंबईकर अनसेफ:'एक है तो सेफ'वरून वर्षा गायकवाड यांचा घणाघात

1 hour ago 1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत झालेल्या सभेवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी टीका केली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप 'एक है तो सेफ'चा नारा देतात. पण त्यांच्यात सत्ताकाळात मुंबईत महिला सुरक्षित नाही, असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी समाचार घेतला आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून भाजप सरकारच्या काळात कंत्राटदार आणि लाडका उद्योगपतीच सेफ आहे, असा हल्लाबोल गायकवाड यांनी केला. वर्षा गायकवाड म्हणाल्या, भाजप सरकारच्या काळात मुंबईत महिला सुरक्षित नाहीत. शाळेत मुली सुरक्षित नाहीत. मंत्रालयात गुंड खुलेआम फिरत आहेत. सत्ताधारी भाजपा युतीचे आमदार, खासदार घरात अन् मशिदीत घुसून मारण्याची धमकी देतात. आमदार पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय, फेसबुक लाईव्हवर नेत्यांची हत्या होत आहे. भाजप सरकारच्या काळात मुंबईकर अनसेफ असून कंत्राटदार आणि लाडका उद्योगपती सेफ असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. मोदी सरकारचा 11 वर्षांत मुंबईवर अन्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कवरील सभेत भाजपने मुंबईत विकास केल्याच्या थापा मारल्या. परंतु वस्तुस्थिती पाहता मोदी सरकारने मागील 11 वर्षांत मुंबईवर अन्याय केला. या कंत्राटदारप्रेमी सरकारने मुंबईतील विकासाच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार आणि कमीशनखोरी केल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. उद्योगपतीला मुंबई विकणे हाच का विकास? केंद्र सरकारला देशातून सर्वात जास्त निधी देणाऱ्या मुंबई शहराला ATM समजून फक्त लुटण्याचे काम केले आहे. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्र, हिरे व्यापारासह महत्वाच्या संस्था व कार्पोरेट कार्यालये गुजरातमध्ये नेली. मुंबई लाडक्या उद्योगपतीला विकण्याचे काम हाच मुंबईचा विकास आहे का? असा सवालही वर्षा गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला. लोकसभेत जागा दाखवली, विधानसभेला सुपडा साफ वर्षा गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरूनही मोदी सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 साली अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे जलपुजन केले. पण अद्याप एक विटही रचली नाही. इंदू मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकही बाकी आहे. मुंबईला सापत्न भावाची वागणूक देऊन विकास केल्याच्या थापेबाजीला मुंबईकर आता बळी पडणार नाही. मुंबईकरांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला जागा दाखवली आहे, विधानसभा निवडणुकीतही भ्रष्ट युतीचा सुपडासाफ करून व्याजासह परतफेड करतील, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article