374 बस मधून होणार मतपेट्यांची ने-आण:एसटीला मिळाला 99 लाख रुपयांचा चेक, प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रावर मतदान यंत्रे, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्राच्या पेट्यांची ने आण करण्यासाठी निवडणूक विभागाने ३७४ बसची आगाऊ बुकिंग केली आहे. यासाठी ९९ लाख रुपयांचा चेकही देण्यात आला आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बसेस निवडणुकीच्या कामासाठी जाणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. विधानसभा निवडणुकीत ३२ लाख २ हजार ७५१ मतदार ३ हजार २७३ मतदान केंद्रावरून मतदान करणार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यात ९ हजार ३०९ मतदान यंत्रे, ४ हजार ५१६ कंट्रोल युनिट, ४ हजार ६१० व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.या यंत्रांची तपासणी पूर्ण केली जात आहे. सर्व मतदार केंद्रावर १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत मतपेट्या पोहोचवण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक प्रशासनाने तिनशे चौऱ्याहत्तर बसेस बुक केल्या आहेत. गावोगावातील मतदान केंद्रावर मतपेट्या पोहोचवण्यासाठी बसला वेळ लागणार आहे. त्यानंतर बस पुन्हा प्रवासी सेवत दाखल होतील. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर बस पुन्हा मतपेट्या आणण्यासाठी रवाना होतील. विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी केंद्रावर मतपेट्या पोहोचवल्यानंतर बसची जबाबदारी संपेल व त्या पुन्हा प्रवासी सेवेसाठी येतील. मात्र, या कालावधीत ५५० पैकी ६८ टक्के बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. २० हजार कर्मचाऱ्यांचे नियोजन जिल्ह्यात मतदान प्रक्रियेसाठी १५ हजार ७१० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून त्याचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी २० हजार ३१४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article