12 आरोपी जेरबंद तर चार लाख 46 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुसद (State Excise Raid) : नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक 2024 च्याअनुषंगाने नितेश शेंडे अधिक्षक,राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ यांच्या आदेशान्वये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुसद दुय्यम निरिक्षक रा. उ. शु. पुसद बिट क्र. 1 आणि 2 यांच्या संयुक्त अवैद्य हातभट्टी निर्मिती केंद्र व विक्री केंद्र तसेच देशी दारू व विदेशी दारू अवैध्य विक्री करणाऱ्या विरुद्ध मोहीम राबविण्यात आली. पुसद तालुक्यातील जनुना, देवठाण तसेच महागाव तालुक्यातील काळी दौलत, सवना व अंबोडा या ठिकाणी छापे मारून एकूण 12 गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
त्यामध्ये 12 आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद (State Excise Raid) करण्यात आले, त्यात हातभट्टी दारू 564 लिटर, रसायन-10430 लिटर एकूण अंदाजे किंमत रुपये 446605/- इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डी एस वाघ निरीक्षक पुसद, अनिल एन पिकले दुय्यम निरीक्षक पुसद, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रमेश राठोड,जवान मानकर, रामटेके, बोंबले तसेच महिला जवान गट्टलेवार यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग नोंदविला.