शहरात समाविष्ट होणाऱ्या नवीन गावांना 5 वर्ष ग्रामपंचायतचाच कर लागणार:सुविधा निर्माण झाल्यानंतर मनपाचे कर लागणार - देवेंद्र फडणवीस
2 hours ago
1
पुणे झोपडपट्टी मुक्त करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. राज्यात येणारे आमच्या नवीन सरकारकडून शहरात समाविष्ट होणाऱ्या भागात अधिक क्रेडिट नोट्स दिले जातील त्यातून विविध व्यवस्था निर्माण करता येतील. नवीन गाव ज्यावेळी मनपात सहभागी होईल त्यावेळी त्यांना सुरुवातीचे पाच वर्ष ग्रामपंचायत कर लागेल. ज्याप्रकारे समाविष्ट गावांमध्ये सुविधा निर्माण होतील त्यानुसार मनपाचे कर लागले जातील असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार भीमराव तापकीर, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी खासदार प्रदीप रावत, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, आरपीआय शहराध्यक्ष संजय सोनवणे,माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे,माजी उपमहापौर दिलीप बराटे , दिलीप वेडे पाटील , दीपक नागपुरे, वर्षा तापकीर, आबा शिळीमकर, अप्पा रेनुसे, राणी भोसले, प्रकाश कदम, प्रदीप धुमाळ, अश्विनी भागवत, अरुण राजवाडे, बाळासाहेब नवले, दिगंबर डवरी, सचिन मुर्हे ,गणेश वर्पे उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, खडकवासला मध्ये भीमराव तापकीर हे यंदा आमदारकीचा चौकार मारतील. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात सरकार आल्या नंतर वेगाने पुण्याचा चेहरा मोहरा बदलणे काम केले गेले. दिल्ली नंतर पुण्यात मेट्रो करण्याचे ठरले आणि त्यासाठी स्वतंत्र महामेट्रो स्थापन करण्यात आले. देशात सर्वाधिक वेगाने पुणे मेट्रो तयार होत आहे. देशात प्रथमच स्वारगेट येथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकत्रित करणारी मल्टी मॉडेल हब तयार करण्यात येत आहे. खडकवासला ते खराडी दरम्यान मेट्रो मार्गास तीन दिवसात आम्ही मान्यता दिली. चांदणी चौक येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजनातून राज्य सरकारने भूसंपादन करून चांदणी चौक कायापालट करून वाहतूक कोंडी मधून नागरिकांची सुटका केली. एआय माध्यमातून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अनेक पर्यायी रस्ते निर्माण करण्यात येत आहे . पुण्याला एक नवीन रिंग रोड देखील मंजूर करण्यात आला असून त्याचे काम पुढील तीन वर्षात होऊन बाहेरून येणारी वाहनांची वाहतूक कोंडी सुटेल. पीएमपीएमएल माध्यमातून अनेक इलेक्ट्रिक बस पुण्यात दिल्या गेल्या आहे त्यामुळे प्रदूषण कमी होईल. पुढे ते म्हणाले, पुण्यात नदी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात कोणतेही सांडपाणी नदीत जाणार नाही तसेच नदीच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येईल. पुणे मॅन्युफॅक्चरिंग हब करण्यासोबतच तंत्रज्ञान हब देखील आम्ही पुण्यामध्ये करत आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)