उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील खडकवासला येथे सभा पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ता मौलाना खलील उर्ररहमान सज्जाद नोमानी यांची क्लिप ऐकवली. यानंतर त्यांनी सज्जाद नोमानी यांच्यावर जोरदार घणाघात केला. “आता व्होट जिहादचा नारा दिला आहे आणि व्होट जिहादचा सेनापती कोण आहे? तुम्ही ऐकलं आहे. या व्होट जिहादकरात हे त्या उलेमानचे तळवे चाटत आहेत आणि या ठिकाणी सांगत आहेत की, दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ. या ठिकाणी व्होट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आवाहन आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला लढावं लागेल. आपण आता एक राहिलो तरच सेफ राहू. एक असू तर सुरक्षित आहोत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मी तुम्हाला ही विनंती करायला आलो आहे. ह्यांचे विचार केवळ महाराष्ट्र नाही तर दिल्ली सरकार हलवायचे आहे. हे छोटे विचार घेऊन आलेले नाहीत. हे या देशाला अस्थिर करण्याचं काम करत आहेत. यामध्ये महाविकास आघाडी सामील झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक तुमची आणि तुमच्या पिढ्ढ्यांची निवडणूक आहे. आता जागी झाला नाहीत तर कधी जागी होणार नाहीत. तुम्हाला जागवण्याकरता आलोय म्हणून कमळाचं बटण तुमच्या पुढच्या पिढीकरता दाबा आणि ह्यांचे नापाक इरादे काढून टाका”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
फडणवीसांनी ऐकवलेल्या क्लिपमध्ये काय आहे?
“दिल्ली सरकारदेखील जास्त दिवस टिकू शकत नाही. आमचा निशाणा केवळ महाराष्ट्र सरकार नाही तर संपूर्ण देशाची सत्ता आहे. मी काल एका यूट्यूब चॅनलच्या इंटरव्ह्यूतही ही गोष्ट सांगितली की, हा एसा व्होट जिहाद आहे ज्याचे सिपेसालार (सेनापती) शरद पवार आहेत. तर उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले हे अझीम सिपाही म्हणजेच महान रक्षक (शिपाई) आहेत. आणि आपला निशाणा हा महाराष्ट्र नाही तर दिल्ली आहे”, असं क्लिपमध्ये म्हटलं आहे.
हे सुद्धा वाचा
“मी ही गोष्ट जाणून आहे की, ते महाराष्ट्रात जिंकले तरी काही बदलू शकत नाहीत. पण मला ही गोष्ट सांगायची आहे, महाराष्ट्रात आता अशी परिस्थिती आहे की, आता हरियाणाच्या विजयानंतर ते इथे जिंकले तर त्यांची महत्त्वकांक्षी आणखी वाढेल. मग ते नव्या महत्त्वकांक्षेने दिल्लीच्या दिशेला अशुद्ध भावनेने पुढे चालून जातील. ते त्यांना जमलं तर दिल्ली सरकारही टिकू शकणार नाही. त्यामुळे आमचा निशाणा केवळ महाराष्ट्र सरकार नाही तर केंद्रातील सत्ता आहे”, असं सज्जाद नोमानी क्लिपमध्ये म्हणाले आहेत.