आटपाडी येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेPudhari Photo
Published on
:
15 Nov 2024, 2:25 pm
Updated on
:
15 Nov 2024, 2:25 pm
आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : विश्वासघात कोणी केला यावर मी बोलत नाही. परंतु, जनतेच्या मनातील सरकार यावे, अशी जनतेची इच्छा होती. अडीच वर्षापूर्वी सरकार बदलले नसते, तर एवढा मोठा निधी आला असता का? विकास कामे झाली असती का? असा सवाल करत लाडक्या बहिणींना विरोध करणाऱ्यांना जोडा दाखवा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. १५ केले.
आटपाडी येथे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य सभेत ते बोलत होते. यावेळी सुहास बाबर, खासदार धैर्यशील माने, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मी गरिबी पाहिली आहे.सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याना पंधराशे रुपयांची किंमत काय कळणार.दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.कुणीही माईक का लाल आला तरी या योजना बंद पडू देणार नाही.लाडक्या बहिणींना सावत्र भावांनी विरोध केला, कोर्टात गेले, कोर्टाने चपराक लागल्यावर दुसऱ्या कोर्टात गेले.आता त्यांना जोडे दाखवा.
ते म्हणाले की, आमची देना बँक आहे. घेना बँक नाही.. पूर्वीच्या सरकारमध्ये हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे होते. परंतु आमच्या सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे देणार आहे. खानापूरात ८ महिन्यात १३५० रुपयांचा निधी दिला.अडीच वर्षाचा निधीच मिळाला नाही तेवढं मी ८ महिन्यात निधी दिला.सर्व राज्यातील मतदारसंघात भरगोस निधी मिळाल्याने विकासकामांना गती मिळाली आहे.३७० कलम हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमधील लाल चौकात आता तिरंगा फडकतोय.आम्ही बदल केल्यानेच हा बदल दिसतोय.
खानापूर विधानासभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना मोठया मताधिक्याने निवडून द्या. त्यांना मंत्री पद देऊन मतदारसंघातील मंत्रिपदाचा दुष्काळ संपवू, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले स्वर्गीय अनिल बाबर यांची उणीव जाणवते आहे.लोकांसाठी काम करणारा हा नेता लोकांसाठी झटला. उठावावेळी ते खांद्याला खांदा लावून उभा राहिले. टेंभूच्या पाण्यासाठी त्यांनी राजकारण विरहित काम केले.सुहास बाबर यांना विजयी करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
बाबर आणि परिवार ही माझी जबाबदारी आहे. तानाजी पाटील हा त्यांचा पाठीराखा जीवाला जीव देणारा किंगमेकर आहे. अशी माणसं दुर्मिळ असतात. त्यांनाही राज्यस्तरावर मोठी जबाबदारी देऊ. या परिसरात एमआयडीसी आणि कारखाना देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
सुहास बाबर म्हणाले की, जनतेच्या भल्यासाठी अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं मतदारसंघाचा विकास झाला.टेंभू सहावा टप्पा मंजूर झाल्याने जनतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी पाणी आणले आणि दुष्काळ हटला. अनिल बाबर यांच्यावर विरोधकांनी टीका केली. पण टेंभूचे दिवास्वप्न आता पूर्ण होत आहे. एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही.