आपण *क मारायची अन् दुसऱ्याचे नाव घ्यायचे:हसन मुश्रीफांना पाडलंच पाहिजे, शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल

2 hours ago 1
काही लोकं निर्लज्जासारखे आम्हाला सोडून गेले. आपण झ* मारायची आणि दुसऱ्याचे नाव घ्यायचे अशातला हा प्रकार असल्याचे म्हणत शरद पवार यांनी अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. हसन मुश्रीफ यांना पाडलंच पाहिजे... पाडलंच पाहिजे... पाडलंच पाहिजे...असे आवाहन शरद पवार यांनी केले. ईडीच्या भीतीने जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्या फायली भाजपने बाजूला ठेवल्या आहेत, असा दावाही शरद पवार यांनी केला. शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजितसिंह घाडगे यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लज येथे शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेले हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावेळी महाराष्ट्राला गरज असताना साथ द्यायची सोडून आमचे काही लोक निघून गेले, असे शरद पवार म्हणाले. मुश्रीफांना संधी दिली, मंत्रिपदही दिले पण... शरद पवार म्हणाले, काही लोकांनी वेगळा रस्ता गेले, दुर्दैवाने त्यांच्यात तुमच्या जिल्ह्यातील लोकांचाही समावेश आहे. एकेकाळी समाजकारणासाठी आम्ही वेगवेगळ्या लोकांना संधी दिली. समाजातील लहान घटक, अल्पसंख्यांकांचा सन्मान करण्याचा आम्ही विचार केला. त्याच दृष्टीने कोल्हापुरात अनेकांची नावे पुढे आली. त्यामध्ये हसन मुश्रीफांचे सुद्धा नाव होते. पण कोण कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आहे, याचा विचार आम्ही केला नाही. त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली आणि ते विधानसभेत गेले. पुढे त्यांना मंत्रिपदही देण्यात आले. पण ज्यावेळी महाराष्ट्राला गरज आहे त्यावेळी साथ द्यायची सोडून आमचे काही लोक निघून गेले. आपण झ* मारायची अन्... ईडीच्या भीतीने जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्या फायली भाजपने बाजूला ठेवल्या आहेत. काही लोकं निर्लज्जासारखे आम्हाला सोडून गेले. काही लोक मी पवारांना सांगून गेलो, असे मोठ्या तोंडाने सांगत आहेत, असे म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळ यांना टोला लगावला. आपण झ* मारायची आणि दुसऱ्याचे नाव घ्यायचे अशातला हा प्रकार आहे. हसन मुश्रीफ यांना पाडलंच पाहिजे... पाडलंच पाहिजे... पाडलंच पाहिजे..., असे आवाहन शरद पवार यांनी केले. शरद पवार म्हणाले की, एक दिवस मला भेटायला आले आणि आम्ही वेगळा विचार करत करतोय, तुम्ही आमच्यासोबत चला. मी म्हणालो आपण भाजपविरोधात मते मागितली, आता त्यांच्यासोबत जायचे म्हणत आहात. हे माझ्याकडून शक्य नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. ईडीची कारवाई टाळण्यासाठी यांनी उद्योग केला काही लोकांनी हळूच कानात सांगितले, तुम्ही आमच्यााबाबत निर्णय घेतला नाही, तर आम्हाला आत जावे लागेल. त्यानंतर त्यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याचे दुसऱ्या दिवशी वाचायला मिळाले. हे सगळे घडू नये म्हणून या लोकांनी हा उद्योग केला आणि याच्यामध्ये किती सत्यता आहे हे परवा छगन भुजबळांनी सांगितले, असेही शरद पवार म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article