Published on
:
15 Nov 2024, 4:33 pm
Updated on
:
15 Nov 2024, 4:33 pm
नवी दिल्ली : सर्व प्रकारच्या परवानग्या आधीच घेतल्या असताना राहुल गांधींचे हेलिकॉप्टर का थांबवले, असा प्रश्न काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारला. काँग्रेस नेते राहुल गांधी झारखंड दौऱ्यावर असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने उड्डाणासाठी परवानगी दिली नव्हती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पत्र लिहीत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच निवडणूक प्रचारात प्रचार क्षेत्र सर्वांना समकक्ष असले पाहिजे, असेही म्हटले.
काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहीले. राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला नजीकच्या इतर नेत्यांच्या प्रोटोकॉलमुळे "नो-फ्लाय-झोन" निर्बंध लागू करण्यात आले, अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याची मागणी केली. जयराम रमेश म्हणाले की, हेलिकॉप्टर थांबल्यामुळे उशीर झाला, अशा वेळी आधीच ठरलेले कार्यक्रमांना एकतर उशीर होत आहेत किंवा रद्द करावे लागु शकतात.
रमेश म्हणाले की, झारखंड विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यभर प्रवास करण्यासाठी आणि सर्व पूर्वनियोजीत सभांमध्ये भाग घेण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळवल्या आहेत. शुक्रवारच्या मंजूर वेळापत्रक आणि परवानगीनुसार राहुल गांधी गोड्डा येथून दुपारी १.१५ वाजता बलबड्डा-देवघर येथे जाण्यासाठी उड्डाण करणार होते, मात्र त्यांना खुप वेळ वाट बघावी लागली. जर अशी परिस्थिती कायम राहिली तर सत्ताधारी आणि त्यांचे नेते नेहमीच अशा प्रोटोकॉलचा फायदा घेऊ शकतात आणि विरोधी नेत्यांच्या निवडणूक प्रचाराला मोहिमेत अडथळा निर्माण पोहोचवू शकतात, असेही रमेश म्हणाले.