नाशिक : पोलीस आयुक्तालय कामकाजाचा आढावा घेताना मंत्री योगेश कदम. समवेत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, मोनिका राऊत.Pudhari News Network
Published on
:
29 Jan 2025, 5:22 am
Updated on
:
29 Jan 2025, 5:22 am
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक शहरातील सुरक्षीततेसंदर्भात पोलिसांचे नियोजन, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 100 दिवस कृती आराखड्याची अंमलबजावणी, पोलिसांच्या कारवाईचे आढावा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला. पोलिस आयुक्तालयात घेतलेल्या आढावा बैठकीत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी कदम यांना माहिती दिली.
राज्याचे गृह राज्यमंत्री कदम हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पोलिस आयुक्तालयास भेट देत विविध विषयांची माहिती जाणून घेतली. त्यात कुंभमेळ्याचे नियोजन, त्यादृष्टीने शहरातील कायदा व सुव्यवस्था-बंदोबस्ताचे नियोजन, शहरात सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन याबाबत पोलिस आयुक्त कर्णिक यांनी माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवस कृती आराखड्याची अंमलबजावणीचीही माहिती कर्णिक यांनी दिली. त्याचप्रमाणे संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी सुविधा, गुंतवणूक प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदी विषयांवरही कदम यांनी आढावा घेतला.
शहरात 'स्टॉप अँड सर्च', गोमांस कारवाई, अंमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्यांवरील कारवाई, टवाळखोर-सराईत गुन्हेगारांवरील कारवाईची माहिती घेत त्यावर कदम यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, मोणिका राऊत यांच्यासह इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.
मंत्री योगेश कदम यांनी शहरातील पोलिस कारवाईचा आढावा जाणून घेताना गुन्हे व गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन कदम यांनी दिले. तसेच अंमली पदार्थविरोधी गुन्ह्यांत व विधी संघर्षीत बालकांचा सहभाग असलेल्या गुन्ह्यांचा तपास करताना विशेष काळजी घेऱ्याचे आदेश कदम यांनी दिले आहेत.