विजय शिवतारे यांना धक्का:पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये नामनिर्देशित सदस्यातून वगळले, शिवसेनेला टाळत राष्ट्रवादी, भाजपच्या आमदाराला स्थान

11 hours ago 2
पुणे जिल्हा नियोजन समितीतून शिवसेना नेत्यांना डावलण्यात आले आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिवसेनेला वगळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले विजय शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यातून वगळण्यात आले आहे. दरम्यान शिवतारे यांना वगळून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके आणि भाजपचे आमदार राहुल कुल यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाकडून याबाबत अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात शेळके आणि कुल यांचा नावाचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीवर विधीमंडळ व संसद यांतून दोन सदस्यांची राज्य सरकारकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त करता येते. त्यानुसार पुणे जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून मावळचे आमदार सुनिल शेळके आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती केली आहे. सुषमा कांबळी अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी याबाबत शासन परिपत्रक जाहीर केले आहे. आमदार धसांना डावलले;‎ सदस्यपदी आ. पंडित, मुंदडा‎ ‎बीडमधून गेवराईचे आमदार‎ विजयसिंह पंडित आणि केजच्या ‎आमदार नमिता मुंदडा यांची‎ नियुक्ती केली गेली आहे. आ.‎सुरेश धस यांना डावलल्याची ‎चर्चा आहे.‎ राज्यातील सर्वच जिल्हा‎नियोजन समित्यांच्या नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित‎ सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याचा ‎निर्णय मंगळवारी राज्याच्या‎ नियोजन विभागाने घेतला होता.‎ त्यानंतर बुधवारी नव्या‎ नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचे‎ आदेश काढण्यात आले. शिवतारे-पवार वाद जुनाच गेली अनेक दिवस राज्याच्या राजकारणात नाराजी नाट्य सुरू आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदावरुन नाराजीच्या चर्चा होत्या. यानंतर पालकमंत्रीपद आणि आता डीपीडीसीच्या नामनिर्देशित सदस्यांमधून सुद्धा शिवसेनेला दूर ठेवण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांना संधी मिळाली आहे. यातच विजय शिवतारे हे अजित पवार यांचे विरोधक आहेत. अजित पवारांनी बघतोच कसा आमदार होतो असे म्हणत 2019 च्या निवडणुकीत शिवतारेंना पराभूत केले होते. यानंतर पवार आणि शिवतारे यांचा वाद वरीष्ठांनी मिटवला. पण आता पुन्हा पुण्यात पवार विरुद्ध शिवतारे वादाचा दुसरा अंक पाहायला मिळणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article