Smoking Effects | पॅसिव्ह स्मोकिंगमुळे हृदयरोग, ब्रेनस्ट्रोकचा १५ ते २० टक्के धोका

2 hours ago 1

Smoking EffectsFile Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

11 Oct 2024, 7:11 am

Updated on

11 Oct 2024, 7:11 am

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

जर तुम्ही धूम्रपान करत नसाल, मात्र तुमच्या मित्रांपैकी किंवा कुटुंबीयांपैकी कोणी धूम्रपान करत असेल तर तुम्हाला हृदयरोग, ब्रेन स्ट्रोक आणि इतर आजारांचा धोका १५ ते २० टक्क्‌यांपर्यंत वाढतो, असे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे.

पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे काय ?

धूम्रपानामुळे केवळ सिगारेट ओढणारी व्यक्तीच नव्हे, तर आजूबाजूला असलेल्या लोकांनाही त्रास होतो. त्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात.

पॅसिव्ह स्मोकिंग खूप धोकादायक

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २००४ मध्ये जगातील ६ लाख मुलांचे आकस्मिक निधन झाले. त्यामध्ये ३१ टक्के मुलांच्या मृत्यूला पॅसिव्ह स्मोकिंग कारणीभूत ठरले आहे. तंबाखूच्या धुरात ४ हजार धोकादायक रसायने असतात. त्यापैकी किमान २५० रसायने हानीकारक आहेत. त्यापैकी ५० रसायने ही कर्करोगाला कारणीभूत ठरतात.

धोका पॅसिव्ह स्मोकिंगमुळे गरोदर महिला आणि बालकांना १५ ते २० टक्क्यांपर्यंत विविध आजारांचा धोका संभवतो, असे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे. महिलांच्या गर्भातील भ्रूणासाठी पॅसिव्ह स्मोकिंग खूप जास्त नुकसानकारक आहे. ज्या गर्भवती महिला पॅसिव्ह स्मोकिंगला बळी ठरतात,

त्यांची मुले कोणत्यातरी व्यंगासह जन्माला येतात. महिलांना बाळंतपणात उच्च रक्तदाब, वेळेपूर्वी प्रसुती, गर्भपाताची समस्या उद्भवू शकते. लहान मुलांना श्वसनाचा त्रास होतो. फुफ्फुसाच्या वाहिन्यांना सूज येणे (ब्रॉन्कोयटीस) तसेच पॅसिव्ह स्मोकिंगचे प्रमाण जास्त झाल्यास कर्करोगाचाही धोका संभवतो.

विषारी धुराचे अवशेष धोकादायक

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, धूम्रपान केल्यामुळे दररोज १४ लोकांचा जीव जातो. सिगारेट ओढणाऱ्या नागरिकांबरोबरच त्यांच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या किंवा वावरणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास होतो.

धूम्रपान केल्यानंतर सिगारेट, विडी आणि सिगार यांच्या धुराचे अवशेष हवेत राहतात. या विषारी धुराचे अवशेष मानवी कपडे, केस, त्वचा, सामान, खोली, कार, कार्पेट आणि अगदी लहान मुलांची खेळणी यांनाही चिकटतात. सिगारेटच्या धुरातून बाहेर पडणारे हे विषारी घटक रासायनिक रिएक्शन देतात आणि कालांतराने अधिक धोकादायक बनतात.

पॅसिव्ह स्मोकिंगमुळे ब्रेनस्ट्रोक, फुफ्फुसाचा कर्करोग, पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे धुम्रपान करणार्या व्यक्तींपासून अंतर ठेवावे. सिगारेट, विडीच्या धुरामुळे आपल्याला त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.

डॉ. सतीश निर्हाळे, न्यूरोलॉजिस्ट,

पॅसिव्ह स्मोकिंगमुळे श्वसनाचा विकार, श्वासनलिकेत सुज येणे, फुफ्फुसाचा आजार, अन्ननलिकेचा कर्करोग, हार्टअटॅक येणे आदी आजार संभवतात. लहान मुलांना श्वसनाचा त्रास होतो. पॅसिव्ह स्मोकिंगचे प्रमाण जास्त असल्यास कर्करोगही होतो. महिलांमध्ये गर्भपात, बाळंतपणातील उच्च रक्तदाब अशा विविध समस्या जाणवतात.

डॉ. प्रणव देशमुख-शेंडे, कार्डिओलॉजिस्ट

Here are the meta keywords for the headline:

- Passive smoking health risks

- Heart disease from passive smoking

- Brain stroke risk from secondhand smoke

- Passive smoking effects

- Secondhand smoke and cardiovascular disease

- 15-20% risk increase from passive smoking

- Health dangers of passive smoking

- Smoking and heart disease

- Secondhand smoke stroke risk

- Smoking-related health hazards

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article