State marathon competition: राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धा; अभिनेत्री रिंकुची विशेष उपस्थिती

2 hours ago 1

परभणीच्या मॅरेथॉन स्पर्धेत एक हजारावर खेळाडू सहभागी होणार : पत्रकार परिषद

परभणी (State marathon competition) : राष्ट्रपिता म. गांधी जयंती, दुर्गा महोत्सव व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधुन परभणीत शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या (State marathon competition) स्पर्धेत राज्यभरातील एक हजारावर खेळाडू सहभागी होणार आहेत. शिवाय उद्घाटन प्रसंगी सिने अभिनेत्री सैराट फेम रिंकु राजगुरु (Actress Rinku) उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक तथा काँग्रेस अनु. जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लाखोंची पारितोषिके, डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांची माहिती

महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलॅटिक्स असोसिएशन व परभणी जिल्हा असोसिएशन च्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरिक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, जि.प. सीईओ नीतिशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशिल जाधव, अ‍ॅड. अशोक सोनी, आंतरराष्ट्रीय धावपट्टू ज्योती गवते, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मंगल पांडे आदींची उपस्थिती राहणार आहे.

स्पर्धा ३ किमी, ६ किमी आणि १० किमी अंतराची राहणार असून प्रत्येक गटातील पहिल्या दहा क्रमांकाच्या विजयी खेळाडूना एकुण दोन लाखाची रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्पर्धा संपताच बक्षीस वितरण होणार आहे. यावेळी खा. संजय जाधव, आ.सुरेश वरपूडकर, आ.डॉ. राहूल पाटील, माजी आ. विजयस भांबळे, डॉ. सिध्दार्थ भालेराव, बाळासाहेब देशमुख आदींची उपस्थिती राहणार आहे. या (State marathon competition) मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेस प्रा.डॉ. माधव शेजुळ, रणजीत काकडे यांची उपस्थिती होती.

सैराट फेम रिंकु राजगुरु राहणार आकर्षण

राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सैराट फेम आर्ची रिंकु राजगुरु (Actress Rinku) उपस्थित राहणार आहे. रिंकु परभणीकरांसाठी आकर्षण ठरणार आहे.

स्पर्धेसाठी १०० तज्ञ पंचाची नियुक्ती

राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा (State marathon competition) महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलॅटीक्स असोशिएशन व परभणी जिल्हा क्रीडा संघटनेच्या मान्यतेने होत आहे. स्पर्धा समन्वयक प्रा.डॉ. माधव शेजुळ, प्रा. डॉ. गुरुदास लोकरे, रणजीत काकडे यांच्या नियंत्रणाखाली १०० तज्ञ पंचाची नियुक्ती करण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article