मतदार संघातील मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर खासदार पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला. अयोध्येच्या खासदारांना पत्रकार परिषदेत या घटनेवर बोलताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
उत्तर प्रदेशातील अयोध्येत तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरूणीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्यानंतर राजकारण अधिकच तापले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यानंतर आता अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांनीही या घटेवर भाष्य केले. आपल्याच मतदारसंघातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पत्रकार परिषदेत या घटनेवर बोलताना खासदार अवधेश प्रसाद ढसाढसा रडल्याचे पाहायला मिळाले. आज रविवारी सपा खासदार अवधेश प्रसाद यांनी अयोध्या हत्याकांडावर पत्रकार परिषद बोलावली. यादरम्यान, ते बोलताना भावनिक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झालेत. आम्ही आमचा मुद्दा लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडू असे म्हणत असताना जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही लोकसभेचा राजीनामा देऊ असं जाहीरपणे सांगितले. पुढे ते असेही म्हणाले, आम्ही आमच्या मुलीची इज्जत वाचवण्यात अपयशी ठरलो अहोत. मुलीसोबत हे कसे घडले? असा सवाल करत त्यांना अश्रू अनावर झालेत. यावेळी त्यांचे समर्थक त्यांना धीर देत असल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ…
Published on: Feb 02, 2025 04:26 PM