Vidur Niti: विदुर यांची नीती मानवी जीवनाच्या विविध पैलूंशी संबंधित आहेत. महात्मा विदुरांनी काही गोष्टी करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. चुकूनही या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका.
Vidur Niti
Vidur Niti: महाभारत महाकाव्य युद्ध आणि महारथी योद्धासंदर्भात माहिती आहे. परंतु महाभारतात विदुर एक सर्वात प्रभावशाली पात्र आहे. राजा धुतराष्ट्राला त्यांनी सडेतोड सल्ले दिले होते. त्यावेळी राजा नाराज होतील, ही चिंताही त्यांनी बाळगली नाही. ते हस्तिनापूरच्या त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांची नीती आजच्या युगातही सर्वांसाठी उपयोगी आहे. विदुर यांची नीती मानवी जीवनाच्या विविध पैलूंशी संबंधित आहेत. महात्मा विदुरांनी काही गोष्टी करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. चुकूनही या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका.
- विदुर नीतीनुसार, व्यक्तीला आपली धन, संपत्ती आणि उत्पन्नाची माहिती कोणालाही देऊ नये. कारण उत्पन्न समजल्यावर लोकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होते. तसेच व्यक्तीने आपल्या खर्चाची आणि नुकसानीची कोणतीही माहिती उघड करू नये. यामुळे तुम्हाला आणखी कमकुवत करण्याची संधी इतरांना मिळते.
- विदुर यांच्या नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीने आपला कमकुवतपणा कोणाकडेही सांगू नये. कारण दुसरी व्यक्ती तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकते. तसेच तुमच्या कुटुंबात होणारी भांडणे आणि समस्यांबद्दल कोणीही माहिती देऊ नये. यामुळे समाजात तुमच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन होते.
- एखाद्या व्यक्तीने त्याचे ध्येय काय आहे? त्याबद्दल कोणाशीकडे बोलू नये. कारण लोक तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात. यामुळे तुमच्या भविष्यातील योजना आणि उद्दिष्टे गुप्त ठेवणे चांगले आहे. तुमचे काम पूर्ण झाल्यावरच उद्दिष्टे आणि योजना सांगितल्या पाहिजेत, असे महात्मा विदुर यांनी म्हटले आहे.
- विदुर नीतीनुसार, एखाद्याने आपले अध्यात्मिक आणि धार्मिक कार्ये उघड करू नये. कारण ते सार्वजनिक केल्यावर या गोष्टींचे महत्त्व कमी होते. तसेच त्यापासून मिळणारे फायदेही कमी होतात.
Disclaimer: हा लेख सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. यामधील तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.