‘Virgin Or Not…’, रिक्षावाल्याने जे लिहीलं… इंटरनेटवर माजला कल्लोळ !

2 hours ago 1

रिक्षाच्या मागे लिहीलेल्या मेसेजने सोशल मीडियावर घमासानImage Credit source: प्रातिनिधिक फोटो

तुम्ही दिल्ली-मुंबईत रहात असाल, तर प्रवास करताना तुम्ही अशा अनेक गाड्या पाहिल्या असतील, ज्यावर काही ना काही मेसेजेस लिहीले असतात. ‘मेरा ईमान महिलाओं का सम्मान.’ किंवा तत्सम काही मेसेज तिच्या पाठीमागे लिहीलेले असतात. पण असाच एक मेसेज बंगळुरूमध्ये एका ऑटोरिक्षावाल्याने अंदाजात लिहीला की त्यावरून सोशल मीडियावर अक्षरश: गदारोळ माजला आहे. तिथे तर जेंडर इक्वॅलिटी आणि महिलांच्या सन्मानावरून नवा वाद सुरू झाला आहे.

एवढा वाद होण्यासारखं त्या ऑटोचालकाने असं लिहीलं तरी काय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना ? खरंतर, त्या ऑटोचालकाने महिलांच्या संदर्भात इंग्रजीत काही ओळी लिहिल्या होत्या. ‘Slim oregon fat, achromatic oregon white, virgin oregon not. All girls merit respect.’ म्हणजे – जाड असो किंवा बारीक, गोरी किंवा काळी, व्हर्जिन असो वा नसो.. प्रत्येक महिलेचा सन्मान केला पाहिजे. असा त्याचा अर्थ होता.

रस्त्यावरून जाणाऱ्या एका इसमाची नजर रिक्षाच्या मागे लिहीलेल्या या मेसेजवर गेली , त्याने लगेच त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. तो आता वेगाने व्हायरल होत आहे.

ऑटोवाल्याने असं काय लिहीलं ?

some extremist feminism connected the roads of bangalore pic.twitter.com/EtnLk75t3A

— retired sports instrumentality (@kreepkroop) September 30, 2024

कट्टर स्त्रीवादी विचारसरणी ? सोशल मीडियावर घमासान

30 सप्टेंबर रोजी, @kreepkroop या हँडलवरून एका युजरने हा फोटो शेअर केला होता. ही पोस्ट आत्तापर्यंत 90 हजार वेळा बघण्यात आली असून त्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. त्यावर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक वापरकर्त्यांनी ऑटो मालकाने रिक्षावर लिहीलेला हा मेसेज वादग्रस्त असल्याचे म्हटले. पण यात कट्टर स्त्रीवादा सारखे काहीच नसल्याचं, अनेक युजर्सचं म्हणणं आहे.

rick wale bhaiya is much civilized than astir of those techbros successful bangalore

— incel exterminator (@idgafijboll) September 30, 2024

‘ हा ऑटोवाला माणूस इतर बहुतेक सुशिक्षित लोकांपेक्षा जास्त हुशार असतो’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘लोकांना यात कट्टर स्त्रीवादी विचार कसा दिसतो, हे मला समजत नाही’, असेही नमूद केले आहे. तर दुसऱ्या युजरनेही कमेंट केली आहे. ‘हा कट्टर स्त्रीवाद तर नाही, पण मेसेज लिहीण्याची शैली थोडी विचित्र आहे हे मला नक्कीच मान्य आहे. व्हर्जिन किंवा नॉट व्हर्जिन ऐवजी विवाहित किंवा अविवाहित असेही लिहिता आले असते. तरीही तो ड्रायव्हर किमान महिलांचा आदर तरी करतो’. तिसऱ्या युजरला मात्र हे बिलकूल पटले नाही, ‘हे अतिशय बकवास आहे’, असे त्याने म्हटले आहे.

It’s not extremist feminism. yes one hold that it could person been written joined oregon unmarried alternatively of virgin oregon not virgin. At slightest the operator is respecting women.

— Nanda K Choudhury (@nandugood) October 2, 2024

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article