राहुल गांधी उद्या 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर:छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे करणार अनावरण, संविधान सन्मान संमेलनालाही उपस्थिती

2 hours ago 1
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी उद्या शुक्रवारी कोल्हापूरच्या 2 दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनालाही ते उपस्थित राहणार आहेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी ही माहिती दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे 4 व 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी खासदार राहुल गांधी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहतील, अशी माहिती काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी दिली. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा दौरा होणार असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे 4 ऑक्टोबर सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन आणि कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमाकडे प्रस्थान. प्रवासाचा मार्ग : कोल्हापूर विमानतळ – शाहू नाका – शिवाजी विद्यापीठ – कावळा नाका – धैर्यप्रसाद चौक – एस.पी. ऑफीस चौक – भगवा चौक, कसबा बावडा, सायंकाळी 6 वाजता – कसबा बावडा येथील समारंभ संपल्यानंतर हॉटेल सयाजीकडे प्रयाण आणि मुक्काम 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता – हॉटेल सयाजी येथून राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाकडे प्रस्थान प्रवासाचा मार्ग : हॉटेल सयाजी – कावळा नाका – दाभोळकर कॉर्नर – व्हिनस कॉर्नर – दसरा चौक - राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, दु.1.30 वाजता - राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथे आगमन व अभिवादन, त्यानंतर संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : राजर्षि छत्रपती शाहू महाराज पॅव्हेलियन, हॉटेल सयाजी, कोल्हापूर , सायंकाळी 4 वाजता – हॉटेल सयाजी येथून कोल्हापूर विमानतळकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम असेल अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article