Washim: बापू यांची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे शिष्य म्हणून मांडणार

2 hours ago 2

मानोरा (Washim):- बहुजन बंजारा काशी पोहरादेवीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यावे, यासाठी माझे गुरू संत डॉ रामराव बापू यांनी पंतप्रधान यांची ५ मार्च २०१८ रोजी राजधानी दिल्लीत भेट घेऊन त्यांना आमंत्रित केले होते. बापूंचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ जवळ आली असुन येत्या ५ ऑक्टोंबर रोजी बंजारा विरासत नंगारा म्युझियम लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान मोदी पोहरादेवीत दाखल होत आहे. त्यावेळी माझे गुरू बापूंची मागणी पंतप्रधान समोर मांडण्याचे भाग्य मला , लाभल्याने सदर मागणी उपस्थित देशभरातील लाखो सेवा भक्तांच्या साक्षीने सोडविण्याची विनंती करणार आहे. अशी माहिती मानोरा येथे पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी शुक्रवारी दिली.

देशभरातील लाखो सेवा भक्तांच्या साक्षीने सोडविण्याची विनंती

दिवंगत संत डॉ रामराव बापूंना पंतप्रधान यांची भेट घेऊन सहा वर्ष पूर्ण झाले आहे. बापूंनी संपूर्ण भारत देशातील बंजारा समाजाला एका सुचित आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी घेऊन पंतप्रधान यांची राजधानी दिल्लीत भेट घेत पोहरादेवीत येण्याचे आमंत्रण दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निमंत्रण स्विकारत येण्याचे बापूंना आश्वासन दिले होते. परंतु तो योग येण्यास उशीर झाला. आता बंजारा विरासत नंगारा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान यांच्या भेटीचा योग ५ ऑक्टोंबर रोजी जवळ जवळ येत असुन बापू हयात नसल्याने त्यांनी केलेली मागणी पंतप्रधान समोर नम्रपणे मांडून बंजारा समाजाला न्याय देणे संदर्भात विनंती करणार आहे. असे पालकमंत्री संजय राठोड यांनी माहिती देताना आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत महंत जितेंद्र महाराज, डॉ महेश चव्हाण व पराग पिंगळे आदी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article