Wife murder Case: धक्कादायक: संशयावरून पत्नीचा खुन करून विहिरीत टाकले…

2 hours ago 1

कोरेगाव, चोप/गडचिरोली (Wife execution Case) : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील लोकेश गुणाजी बाळबुद्धे वय अंदाजे 32 वर्षे याने संशयावरून पत्नीशी वाद घालून खलबत्याने डोक्यावर वार केला व नंतर शेजारील विहिरीत टाकल्याची घटना आज दिनांक 16 ऑक्टोबरला दुपारी 11:00 वाजताच्या सुमारास घडली.

लोकेश बाळबुद्धे व त्याची पत्नी स्नेहा, व लोकेशचेआई, वडील असा संयुक्त कुटुंबाने राहत होते लोकेशला दोन मुले आहेत. त्यातील मोठा मुलगा सहा वर्षाचा असून पहिल्या वर्गात शिकत आहे तर लहान मुलगा तीन वर्षाचा असून तो अंगणवाडीत जात आहे लोकेशला दारूचे व्यसन होते. लोकेश व मृतक स्नेहा लोकेश बाळबुद्धे वय अंदाजे 32 या दोघा पती-पत्नीचे नेहमीच संशयावरून भांडण होत होते. यात वडिलांनी हस्तक्षेत केल्यास वडिलांनाही दमदाटी करायचा आज दिनांक 16 ऑक्टोबरला दुपारच्या अकरा वाजताच्या सुरालास लोकेश व स्नेहा यांच्यात वारंवार संशय घेत होता. त्यामुळे आज दोघात कडाक्याचे भांडण झाले.

त्यावेळी लोकेशचे वडील गुणाजी बाळबुद्धे हे स्वतःची सायकल घेऊन दुरुस्तीसाठी गावात गेले होते. लोकेशची आई तिचे माहेर कोरेगावचे असल्याने माहेरी घरी गेली होती व लहान मुलगा घरीच झोप दुसऱ्या खोलीत पलंगावर झोपेत होता. मोठा मुलगा शाळेत गेला होता. दोघा पती-पत्नीचे भांडण विकोप्याला गेले व लोकेशने शेजारी असलेला खलबत्ता उचलून स्नेहाच्या डोक्यावर एक दोनदा वार केल्याने स्नेहा गंभीर जखमी होऊन खाली कोसळली (Wife execution Case) स्नेहाच्या डोक्यातून रक्ताच्या धारावाहत होत्या.

त्या स्थितीत स्नेहाला मृत पावल्याचे समजतात लोकेशने तिला उचलून घराबाहेरील चौकातील विहिरीत नेऊन टाकले व स्वतः देसाईगंज पोलिसांसमोर जाऊन पत्नीला मारल्याचे कबुली देऊन आत्मसमर्पण केले. देसाईगंज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून प्रेत विहिरी बाहेर काढून पंचनामा करून देसाईगंज येथिल रुग्णालयात सवविच्छेदनासाठी पाठवण्यात आरोपीला अटक करून पोलीस निरीक्षक अजय जगताप हे घटनास्थळी स्वतः पोहोचून त्यांनी घटनेची माहीती घेतली त्यांच्या मार्गदर्शक खाली उपनिरीक्षक माने मॅडम व देसाईगंज पोलीस अधिक तपास करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article