अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमची तुरुंगात भेट:ATS ने 2 जणांना घेतले ताब्यात, सलग 20 तासांपासून चौकशी सुरू; नाशिकमध्ये खळबळ

2 hours ago 1
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी तथा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याची मैत्रिण हीना व अन्य एका व्यक्तीने गुरुवारी त्याची भेट घेतली. या भेटीची खबर कानावर येताच दहशतवाद विरोधी पथकाने तत्काळ तुरुंगाच्या दिशेने धाव घेऊन या दोघांना ताब्यात घेतले. सध्या गत 20 तासांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, हीनासोबत अबू सालेमची भेट घेण्यासाठी आलेला व्यक्ती परदेशी आहे. त्याला एटीएस अर्थात दहशतवादविरोधी पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या दोघांनाही कडेकोट बंदोबस्तात नाशिक रोड पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. या दोघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, आजही त्यांच्याशी प्रश्नोत्तरे सुरू आहेत. यावेळी राज्य गुप्तचार विभाग व शहर गुन्हे शाखेचे अधिकारीही उपस्थित आहेत. एटीएसचा काय जाणून घेण्याचा प्रयत्न हीना व तिच्या सहकाऱ्याची गत 20 तासांपासून चौकशी सुरू आहे. हीना ही आताच अबू सालेम याला भेटण्यासाठी का आली? तिच्या भेटीमागील उद्देश काय होता? तसेच तिच्या यापूर्वीच्या भेटीचे तपशील या चौकशीतून जाणून घेतला जात आहे. विशेषतः हीनासोबत आलेला परदेशी व्यक्ती कोण आहे? त्याने अबू सालेमची भेट का म्हणून घेतली? याचीही पडताळणी एटीएसकडून केली जात आहे. हीनासोबत आलेला परदेशी व्यक्ती नागपूरच्या एका गुंडाला भेटण्यासाठी आल्याचीही माहिती आहे. अबू सालेमला दिल्लीला हलवण्यात आले होते उल्लेखनीय बाब म्हणजे अबू सालेम सध्या नाशिकरोड तुरुंगात शिक्षक भोगत आहे. पण काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव त्याला तळोजा कारागृहातून नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले होते. त्यानंतर एका सुनावणीसाठी त्याला दिल्लीलाही वर्ग करण्यात आले होते. 2002 च्या एका खंडणीच्या प्रकरणात दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजर करण्यासाठी त्याला तिथे नेण्यात आले होते. यावेळी त्याच्या सुरक्षेसाठी ब्लॅक कॅट कमांडोही तैनात करण्यात आले होते. त्यामुळे नाशिकच्या रेल्वे स्थानकासह जेलरोड परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. हे ही वाचा... कागलच्या जागेवरून बाप-लेकात मतभेद:संजय मंडलिक यांचा हसन मुश्रीफ यांना पाठिंबा, पण मुलाचे स्वतःच मैदानात उतरण्याचे संकेत कोल्हापूर - समरजीतसिंह घाटगे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशामुळे कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक हायव्होल्टेज झाली असताना आता या येथील निवडणुकीची धग आता थेट माजी खासदार संजय मंडलिक यांच्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहे. संजय मंडलिक यांनी कागल येथून जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. पण त्यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी मात्र समरजीत घाटगेंविरोधात मेळावा घेत स्वतःच मैदानात उतरण्याचे संकेत दिलेत. यामुळे या बाप-लेकांतच मतभेद निर्माण झाल्याची चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article