अंबादास दानवेंकडून पहाटेच्या शपथविधीची आठवण:23 नोव्हेंबरलाच जनता सत्ताधाऱ्यांचा निकाल लावणार, सत्ताधाऱ्यांवर निशाणा

3 days ago 3
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यंदाच्या निवडणूक निकालाच्या तारखेवरुन विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादार दानवे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पहाटेच्या शपथविधीच्या तारखेच्या दिवशीच जनता यांचा निकाल लावेल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांना बहुमत मिळाले होते. मात्र काही वादामुळे भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा होती. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी युती करत पहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पहाटेचा शपथविधी म्हणून याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. अंबादास दानवे काय म्हणाले? अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये महायुती सरकारला पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली आहे. पहाटेच्या शपथविधीचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे. 'हा फोटो आठवतोय ना? या पहाटेच्या शपथविधीची तारीख होती 23 नोव्हेंबर 2019. आता 23 नोव्हेंबर 2024 रोजीच महाराष्ट्राची जनता आणि महाविकास आघाडी यांचा निकाल लावणार आहे.' काळे जॅकेट आणि पांढरा शर्ट घातलेले या फोटोतील नेते आता गेले दोन वर्षांतील घटनाबाह्य सरकारच्या काळातील जंत्री आपल्यापुढे वाचतील. मात्र यांनी पाच वर्षांपूर्वी केलेला हा पहाटेचा शपथविधी फक्त लक्षात ठेवावा.. बाकी विजय आपलाच आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे. अशी असेल महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया हेही वाचा... महाराष्ट्रात प्रथमच 6 मोठ्या पक्षांमध्ये लढत:शिवसेना-भाजपमध्ये तेढ, शिंदे-अजितदादा गटाची बंडखोरी; 2019 पासून काय-काय बदल झाले महाराष्ट्राच्या मागील विधानसभा निवडणुकीत म्हणजेच 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले होते. सरकार स्थापन होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आपली बाजू बदलली. यानंतर गेल्या 5 वर्षांत एवढा गदारोळ झाला की सगळी समीकरणेच बदलून गेली. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article