अकलूजमध्ये 11 नवदुर्गांचा केला सन्मान:रोटरी क्लब व जिजाऊ‎ब्रिगेडचा उपक्रम‎

4 days ago 3
अकलूज रोटरी क्लब अकलूज आणि जिजाऊ ब्रिगेड माळशिरस तालुका यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त "सन्मान नवदुर्गांचा" हा उपक्रम रविवारी घेण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात काम करत असणाऱ्या ११ महिलांचा डॉटर मॉम्स फाउंडेशनचे अध्यक्षा तसेच शिवरत्न शिक्षण संस्थेच्या चेअरमन शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते गौरव पत्र आणि रोप देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शोभा तानाजी वाघमोडे पत्रकार,नियाजबी शरफुद्दीन तांबोळी आरोग्य सेविका,जयश्री शंकर अटक सफाई कामगार जिल्हा उपरुग्णालय,नातेपुते, शितल दळवी अकलूज,विद्या वाघमारे महिला वकील, माळशिरस, प्राची बाबर महिला पोस्टमन, उर्मिला सतीश हरिहर एस टी बस वाहक,अलका कदम हवालदार,मनीषा जाधव आरोग्य सेविका यांचा नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सचिव मनिष गायकवाड, नवनाथ नागणे,बबनराव शेंडगे,जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा मनोरमा लावंड,अक्काताई माने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष प्रिया नागणे यांनी केले तर सूत्रसंचालन सुहास उरवणे यांनी केले व आभार मनोरमा लावंड यांनी मानले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article