अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्निर्माणाचे काम गतीने:29 कोटी रुपयाचें बसस्थानक येत आहे आकारास

2 hours ago 1
अक्कलकोट तीर्थक्षेत्री महाराष्ट्रासह देशभरातून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्निर्माणाचे काम अंतिम टप्यात आहे. त्यामुळे स्वामीभक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अक्कलकोट बस स्थानकाच्या काम पुर्णत्वास आले असुन २९ कोटी रुपयांचें हे बसस्थानक अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारे ठरत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नामुळे विकास होत आहे.तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत बसस्थानक हे पुनर्निर्माणाच्या प्रतीक्षेत होते. जुन्या बसस्थानकात सुविधांचा अभाव होता. अक्कलकोट तालुकावासीय व परगावच्या लाखो भाविक भक्तांची भव्य बसस्थानक बांधण्याची मागणी होती. अक्कलकोट बसस्थानकाची अवस्था अत्यंत बिकट होती. मोडकळीस आलेली इमारत घाणीचे साम्राज्य अतिक्रमणाचा विळखा, स्वच्छतागृहांचा अभाव मोकाट जनावरांचा वावरयामुळे बसस्थानक हे बकाल बनले होते. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून बसस्थानक बदलाच्या प्रतीक्षेत होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी महायुती सरकारच्या काळात पाठपुरावा करून सुमारे २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला अक्कलकोटचे नूतन बसस्थानक हे तीन मजली आहे. दोन चाकी वाहन, रिक्षा आणि चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहन तळ, ११ मोठे व्यापारी गाळे,भक्तनिवास, आरक्षण कक्ष, शिवनेरी शिवशाही, शिवाई अशा बसेससाठी स्वतंत्र प्रतीक्षालय, वाहक चालक विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, स्वतंत्र महिला वाहक विश्रांती कक्ष, अत्याधुनिक स्वच्छतागृहे, सर्व सोयीने युक्त कॅन्टीन, कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, बसेस साठी एकूण २२ फलाट असे वैशिष्ट्य आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article