अचारसंहिता लागू होताच हिंगोली शहरातील बॅनर:पोस्टर उतरविण्यास सुरवात, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी रंगवलेल्या फलकावर रंग रंगोटी

2 days ago 2
विधानसभा निवडणुकीची आदर्श अचारसंहिता लागू होताच मंगळवारी ता. 15 दुपारपासूनच शहरासह जिल्हाभरातील राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर उतरविण्यास सुरवात झाली असून विविध ठिकाणी प्रचारासाठी रंगवलेल्या फलकावर रंग रंगोटी करण्यात केली जात आहे. हिंगोली शहरासह जिल्ह्या्त विविध धार्मिक कार्यक्रम, नेते, कार्यकर्त्यांचे वाढदिवस, सण, उत्सवा निमित्त शुभेच्छा संदेशाचे फलक, बॅनर उभारण्यात आले होते. या फलकांच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार केला जाऊ लागला होता. या शिवाय शहरी भागा सोबतच ग्रामीण भागातही विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी रंगरंगोटी करून आपणच उमेदवार असल्याचे दाखविण्यास सुरवात केली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील भिंती राजकिय पक्षांच्या नेत्याच्या प्रचाराने रंगल्या होत्या. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आदर्श आचरसंहिता जाहिर होताच शहरी भागासह जिल्हाभरातील राजकिय पक्षांचे पोस्टर, बॅनर उतरविण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. पोस्टर व बॅनर काढण्यात आल्याने आता रस्ते व सार्वजनिक चौकांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. या शिवाय गावोगावी राजकिय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी प्रचारासाठी रंगविण्यात आलेल्या भिंतीची रंगरंगोटी केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात आदर्श अचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, प्रतिक्षा भुते, विकास कामे यांच्या मार्गदर्शनासाठी अचारसंहिता पथक स्थापन करण्यात आले आहे. हिंगोली, वसमत, कळमनुरी या तीनही विधानसभा क्षेत्रात हे पथक कार्यरत राहणार असून ज्या ठिकाणी फलक, बॅनर दिसतील त्या ठिकाणी तातडीने आचरसंहिता भंगाची कारवाई केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. हिंगोली शहरात पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांचे आचारसंहिता पथक कार्यरत असून या पथकाने शहरातील सुमारे 60 पेक्षा अधिक फलक, बॅनर उतरविले आहेत. या शिवाय 100 पेक्षा अधिक ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने रंगविलेल्या भितींवर रंगरंगोटी केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article