अजित पवारांना साताऱ्यात धक्का:आमदार दीपक चव्हाण अन् जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या पक्षात करणार प्रवेश

4 days ago 2
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी पक्षातून फुटून गेलेल्या अजित पवार यांना सातारा जिल्ह्यामध्ये चांगलाच झटका देण्याचे पाऊल टाकलेले आहे. आज सोमवार दि 14 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू असलेल्या संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे अजित पवार यांना सोडून देत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी शरद पवारही फलटण येथे आज येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. फलटण येथे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आ. दीपक चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिकेत राजे नाईक निंबाळकर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीत राजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत यामुळे अजित पवार यांच्यासह महायुतीला हा मोठा धक्का मानला जातो. पक्षप्रवेश व जाहीर सभा सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता फलटण येथील अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही मोठी खेळी खेळलेली आहे. गेल्याच महिन्यात शरद पवार हे सातारा येथे आले असताना अजित पवार पक्षाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम हेही पक्ष सोडून शरद पवार यांच्या गटात सामील झालेले आहेत. येत्या काही दिवसात आणखीनही बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळतील यात काही शंका नाही. अजितदादांना मोठा धक्का आजच्या प्रवेशावेळी रामराजे नाईक निंबाळकर हे स्वतः मात्र शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश तांत्रिक दृष्ट्या घेणार नसले तरी त्यांचे सर्व आजूबाजूचे सहकारी व कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या पक्षात सामील होत असल्याने फलटण, माण, वाई, खंडाळा, कोरेगाव या भागात मात्र अजित पवार यांना चांगलाच धक्का बसणार आहे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article