अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा महायुतीकडून प्रकाशित:शिंदे, फडणवीस, अजित पवारांची एकत्रित पत्रकार परिषद

2 days ago 2
अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा महायुतीकडून प्रकाशित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीने एकत्रित पत्रकार परिषद घेत आपले रिपोर्ट कार्ड सादर केले. हे दोन पानांचे रिपोर्ट कार्ड असून या माध्यमातून केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा सादर करत असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले. विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. आरोप करताना विरोधकांनी तारतम्य बाळगले पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे. आमच्या योजनांना अभूतपूर्व प्रतिसाद राज्यातील जनतेचा मिळाला आहे. त्यामुळे विरोधक थोडेसे गडबडलेले आहेत. काही जण घाबरलेले असल्याचा आरोप देखील करत आहेत. मात्र, मी गडबडले असल्याचे म्हणेल, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. लाडकी बहीण योजना जाहीर केली, त्यावेळी या योजनेची अंमलबजावणी होणारच नसल्याचा आरोप विरोधक करत होते. मात्र आता अडीच कोटी महिलांच्या खात्यात महिलांचे पैसे मिळाले आहेत. त्यामुळे विरोधकांना बहिणीच्या आयुष्यात होत असलेला सकारात्मक बदल पचणी पडत नसल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ते निवडणुकीपुरतेच पैसे मिळणार असल्याचे म्हणत आहे. मात्र, या योजनेसाठी तरतूद करण्यात आली असूनही पैसे महिलांना मिळत राहणार असल्याचा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article