अध्यात्मासह भक्तीभाव निर्माण करावा- फिरके:न्हावीतील खंडोबा देवस्थानात कार्तिक स्नान, काकड आरती सोहळ्याची सांगता

6 hours ago 1
येथे संत सेवा मंडळाने सलग २१ वर्षांपासून परिसरात सुरू केलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त आहे. शालेय जीवनापासूनच त्यांच्या मनामध्ये अध्यात्माची आणि भक्तिभाव बद्दलची आवड निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललित फिरके यांनी केले. गावात महिनाभरापासून सुरू असलेल्या कार्तिक स्नान, काकड आरती सोहळा सांगता समारंभ झाला. यावेळी अध्यक्षीय स्थानावरून सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललित फिरके बोलत होते. यावेळी पुढे बोलताना फिरके म्हणाले, आज उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थ िनी हा भविष्यातील भाविक तसेच सुसंस्कृत नागरिक बनण्याची अपेक्षा करणे हा होय आणि हे कार्य संत सेवा मंडळ गेल्या २१ वर्षांपासून अविरतपणे करीत आहे. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे खंडोबा देवस्थान मंदिराच्या आवारात पार पडला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन सुधाकर चौधरी, विशाल महाजन, पंडीत चोपडे, मोहन धनगर व मान्यवर उपस्थित होते. बाल वारकऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी देणगी स्वरूपात मोहन धनगर, दीपक पाटील (आळंदी देवाची) व या दात्यांनी सरळ हाताने मदत केली. सर्व विद्यार्थ्यांची श्रीक्षेत्र डोंगरदे येथील श्रीपंत मंदिर जागरूक देवस्थान येथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची अध्यात्मिक सहल आयोजित करण्यात येऊन त्या ठिकाणी सर्व उपस्थितांना देवस्थानचे गुरुवर्य महाराज यांचे आशीर्वाद पर भाषण व तेथील स्थानाचे महत्त्व पटवून दिले. ग्रामप्रदक्षिणेत ८७ बाल टाळकरी सहभागी महिनाभर चालणाऱ्या या सोहळ्यात कार्तिक दिंडीच्या ग्राम प्रदक्षिणेसाठी अनेक शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थ ्यांनी सहभाग नोंदवत असतात. यावर्षी जवळपास ३५ विद्यार्थी व ५२ विद्यार्थिनी मिळून ८७ बाल टाळकरी सहभागी झाले होते. प्रत्येक सहभागी होणाऱ्या टाळकऱ्यास संत सेवा मंडळाकडून बॉलपेन, हरिपाठ, वारकरी जीवन संध्या, काकड आरती भजन मालिका, पंचरत्न गीता, ज्ञानेश्वरी या प्रकारचे ग्रंथ प्रदक्षिणेसाठी येण्याच्या उपस्थितीनुसार भेट म्हणून देण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article