19 तारखेला मोठा बॉम्ब फुटलाच होता. नोटांचा बॉम्ब वसई विरारमध्ये फुटला तो लोकांनी पाहिला आहे, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता असे म्हणत अदानी प्रकरणावरून टोला लगावला आहे.
भाजप मुंबई सचिव सचिन शिंदे ह्यांनी आज मातोश्री येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केलं. ह्यावेळी विभागप्रमुख महेश सावंत, सिनेट सदस्य प्रदिप… pic.twitter.com/SeiNoNGQEs
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 22, 2024
आज मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात प्रवेश केला. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की,सचिन शिंदे यांच्याबाबतीत अन्याय नाही झाला पण न्याय सुद्धा नाही झाला. मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही. तसेच कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता. 19 तारखेला मोठा बॉम्ब फुटलाच होता. नोटांचा बॉम्ब वसई विरारमध्ये फुटला तो लोकांनी पाहिला आहे. काल जो बॉम्ब फुटला त्यामुळे फक्त देश नाही तर जग हादरले आहे. एवढा मोठा घोटाळा कसा काय होऊ शकतो असा प्रश्न लोकांना पडला आहे. आता या घोटाळेबाजांचे करायचे काय हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.