अनिल देशमुख यांनी या वयामध्ये अशी स्टंटबाजी करायला नको:सहानुभूती मिळवण्याच्या नादात केलेला प्रकार चुकीचा; चंद्रशेखर बावनकुळे यांचा निशाणा

1 day ago 2
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी केलेली ही स्टँडबाजी असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी या वयात अशी स्टंटबाजी करायला नको, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. मात्र, सहानुभूती मिळवण्याच्या नादात त्यांनी केलेला हा प्रकार चुकीचा असल्याचे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. राज्यात महायुतीच्या उमेदवारांचा विजयाचा विश्वास देखील त्यांनी माध्यमंशी बोलताना व्यक्त केला. अनिल देशमुख यांनी प्रकार केलेला प्रकार चूकीचा असल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या काळात सहानुभूती मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांनी केलेली स्टंटबाजी पाहिली तर ती योग्य नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भात पोलिसांनी केलेल्या तपासात सर्व गोष्टी समोर आल्या असल्याचा देखील दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात बुमरँग झाला असल्याचेही ते म्हणाले. या मतदारसंघातील जनता महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करेल, असेही ते म्हणाले. निवडणुकीत एक तर विजयी होणार किंवा परभूत होणार. मात्र, या वयामध्ये अनिल देशमुख यांनी अशी स्टंटबाजी करायला नको, अशा शब्दात बावनकुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. काटोलमधून विजयाचा विश्वास विकासाच्या महायज्ञात निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवार नक्कीच विजय होतील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. कामठी विधानसभा मतदारसंघात देखील मोठ्या विजयाचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र जनता ही महायुतीच्या बाजूने मतदान करतील, असा दावा देखील त्यांनी केला. कामठी विधानसभा मतदारसंघातील जनता मला नक्कीच सेवा करण्याची संधी देतील, असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... अजित पवार यांचे मोठे वक्तव्य:'त्या' ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे - नाना पटोलेंचा; म्हणाले, एक बहीण तर दुसऱ्यांसोबत मी काम केले सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावरील बिटाकॉइन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा या दोघांचाच आवाज असण्याची शक्यता वर्तवली आहे. या संदर्भात अजित पवार म्हणाले की, "जे काही ऑडिओ क्लिप दाखवले जात आहे, मला एवढेच माहित आहे की, मी या दोघांसोबत काम केले आहे. त्यापैकी एक माझी बहीण आहे. दुसरे असे आहेत ज्यांच्यासोबत मी काम केले आहे. त्यांचा आवाज मला ओळखता येतो. मात्र, या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर सर्व 'राज' म्हणजेच सर्व सत्य स्पष्ट होईल.' पूर्ण बातमी वाचा....

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article