जर्मनीचे औद्योगिक शहर स्टटगार्टचे फुटबॉल मैदान MHP एरिनावर News9 ग्लोबल समिटचा शुभारंभ सुरू झाला आहे. यावेळी Tv9 नेटवर्कचे MD & CEO बरुण दास यांनी या समिटबाबतचं मनोगत व्यक्त केलं. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क TV9 ला स्टटगार्टला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद जर्मनी. हा माझ्या संपूर्ण Tv9 नेटवर्क तसेच आमचे होस्ट Fau ef B स्टटगार्टसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. न्यूज9 ग्लोबल समिट हा भारत-जर्मनी संबंधातील मैलाचा दगड आहे, असं उद्गार MD & CEO बरुण दास यांनी काढले.
जीवन हा एक महान प्रवास आहे. मला जर राहण्यासाठी भारताशिवाय एखादा देश निवडायला सांगितलं तर मी जर्मनीची निवड करेन, असं मी नेहमीच माझ्या कुटुंब आणि मित्रमंडळींना सांगत आलो आहे. त्याचं एक कारण म्हणजे जर्मनीत सर्वात लोकप्रिय असलेल्या नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या देशातून मी आलो आहे, असं बरूण दास म्हणाले.
टागोरांसाठी प्रचंड गर्दी
रवींद्रनाथ टागोर यांनी 1921, 1926 आणि 1930मध्ये जर्मनीचा दौरा केला होता. त्यांच्या कवितांचा अनुवाद जर्मन लेखक मार्टिन काम्पचेन यांनी केलं आहे. मार्टिन यांनी टागोरांच्या आठवणी सांगताना काही महत्त्वाच्या नोंदी नोंदवल्या आहेत. टागोर ज्या ठिकाणी भाषण करायचे ते संपूर्ण हॉल खचाखच भरून जायचे. प्रचंड गर्दीमुळे ज्यांना हॉलमध्ये प्रवेश नाकारला जायचा, ते लोक हाणामारी करायचे, असं मार्टिन यांनी म्हटलं आहे. याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापून आल्या आहेत. ‘पूर्वेचा बुद्धिमान व्यक्ती’ आणि ‘एक रहस्यवादी मसिहा’ म्हणून जर्मन मीडियाने भारताच्या या महान कवीचा गौरव केला आहे. जवळपास एका शतकापूर्वीची ही गोष्ट आहे, असंही बरूणदास यांनी सांगितलं.
हा क्षण कायम स्मरणात राहील
तुमच्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी उभा आहे, हा एक योगायोग आहे. न्यूज मीडियाचं हे शिखर संमेलन आहे. वैश्विक ठिकाणी हे संमेलन होत आहे. आणि या शहराचं नाव स्टटगार्ट आहे, असंही Tv9 नेटवर्कचे MD & CEO बरुण दास यांनी सांगितलं.
इनोव्हेशनच्या राजधानीत एक नवीन मीडिया टेम्पलेट तयार करणे, विकासाला प्रोत्साहन देण आणि दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांत योगदान देणं हा वेगळाच अनुभव आहे. भारत-जर्मनीचे राष्ट्रगीत एकसाथ गाणं हा एक असा क्षण आहे, जो मी कायम स्मरणात ठेवणार आहे, असंही ते म्हणाले.
संस्कृत-जर्मन भाषेचं अनोखं नातं
टागोरांचं जर्मनीशी नातं होतंच. पण भारतातील सर्वात जुनी भाषा संस्कृत आणि जर्मनच्या दरम्यानचं लँग्वेज बाँड पाहूनही मी आश्चर्यचकीत झालो आहे. संस्कृतमध्ये मास्टर्स करणारे हेनरिक रोथ हे पहिले जर्मन व्यक्ती होते. त्यांनी भारताचा दौरा केला आणि संस्कृतच्या रहस्यामुळे मंत्रमुग्ध झाले, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
फ्रेडरिक श्लेगल आणि ऑगस्ट श्लेगल यांनी संस्कृत भाषेचा मागोवा घेतला. त्यावर संशोधन केलं. आता जर्मनीच्या आघाडीच्या विद्यापीठांमध्ये संस्कृत शिकवली जात आहे. भारत आणि जर्मनीला जोडणारा हा असा मूळ डीएनए आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मैत्रीचा रोडमॅप
न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये भारत आणि जर्मनीच्या संबंधाला नव्या उंचीवर नेण्यासाठीच्या रोडमॅपवर चर्चा करण्यासाठी दिग्गज नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. माझ्यासाठी ही सर्वात मोठ्या आनंदाची बाब आहे, असंही Tv9 नेटवर्कचे MD & CEO बरुण दास यांनी म्हटलं.
रेल्वे, माहिती प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिक मंत्री अश्विनीव वैष्णव आणि संचार तसेच उत्तर पूर्व विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे भारतातून खास या कार्यक्रमासाठी जर्मनीला आले त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. तसेच जर्मनीचे दोन वरिष्ठ धोरण निर्माते फेडरल मिनिस्टर केम ओजडेमिर आणि बाडेन-वुर्टेमबर्गचे मंत्री विल्फ्रेड क्रेश्चमॅन दोन दिवस आमच्यासोबत असणार आहेत. या संमेलनाला मार्गदर्शन करणार आहेत, त्याबद्दल मी खरोखरच सौभाग्यशाली आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
या समिटचे वैशिष्ट्ये म्हणजे उद्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुख्य भाषण आहे. मी आमच्या जर्मन पार्टनर्स, तसेच फाऊ ईएफ बी स्टटगार्ट आणि बेडेन वर्टेम्बर्ग राज्याचा आभारी आहे. त्यांच्या सहकार्यामुळे हा सोहळाच शक्य झाला नसता, असंही ते म्हणाले.
टीवी9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी उत्कृष्ट भागीदारीसाठी रुवेन यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी बेडेन-वर्टेम्बर्गचे पहिले सचिव फ्लोरियन हस्लर यांचे आभार मानताना सांगितले की, “आम्ही आज संध्याकाळी आपल्याला ऐकण्यास उत्सुक आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की, “आम्हाला बुंडेसलीगा आणि डीएफबी-पोकल सारख्या जर्मनीतील प्रतिष्ठित संस्थांना आपले भागीदार म्हणून अत्यंत आनंद झाला आहे.” आजची संध्याकाळ अत्यंत रोमांचक असणार आहे. या संध्याकाळच्या कार्यक्रमाची सुरुवात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाषणांनी होईल, असंही त्यांनी सांगितलं.