अपघात प्रवण स्थळांवर सोलर ट्रॅफिक सिग्नल:रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरात 3 ठिकाणी व्यवस्था, आवश्यकतेनुसार संख्या वाढवणार
2 hours ago
1
शहरातील रहदारी सुरळीत राहावी. दुर्घटना होऊ नये, या उद्देशाने पोलिस पेट्रोल पंप चौक, फरशी स्टॉप चौक, सुंदरलाल पटवा चौकात ‘सोलर ट्रॅफिक सिग्नल' बसवले आहेत ,अशी माहिती वाहतूक पोलिसांद्वारे दिली. शहरात चार अपघात प्रवण स्थळांवर ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता असल्याने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ‘सोलर ट्रॅफिक सिग्नल'ची मागणी वाहतूक पोलिसांद्वारे केली होती. त्यानंतर सौर ऊर्जेवरील चार ट्रॅफिक सिग्नल वाहतूक पोलिसांना मिळाले. त्यामुळे विजेची बचत होणार आहे. ज्या चौकांत सिग्नल अभावी अपघात होतात तेथे सिग्नलची सोय झाली. हे चारही चौक वर्दळीचे आहेत. पोलिस पेट्रोल पंप चौकातून एसटीची वाहतूक सुरू असते. फरशी स्टॉफ चौकातही रहदारी वाढली असून, पटवा चौकाकडून चांदूर रेल्वेकडे जाणारी वाहतूक असते. बडनेरा रस्ता रहदारीचा रस्ता असून, नवाथे चौकातील चौफुलीवर सिग्नल बसवणार आहे. येथून एक रस्ता अंडरपासकडे, एक बडनेराकडे, एक रवी नगरकडे तर एक रस्ता राजकमल चौकाकडे येतो. त्यामुळे येथे पीडब्ल्यूडीने चौफुलीवर जागा दिल्यास तेथे सिग्नल बसवणार आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रित राहून अपघाताचे प्रमाणही कमी होईल, असे शहर वाहतूक पोलिसांना वाटते. लोकसंख्या, वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी, वाहतुकीची कोंडी ही नेहमीचीच समस्या झाली . रस्त्यांची रुंदी वाढली नाही, त्यासाठी जागाच नाही. मुख्य चौकांत स्वयंचलित ‘सोलर ट्रॅफिक सिग्नल'' लावल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल. मात्र, यासाठी वाहतूक पोलिसाची नियुक्ती लागणार आहे. नवाथे चौकामध्ये आता सोलर सिग्नल लावणार ^ अपघात रोखण्यासाठी शहरात चार ठिकाणी ट्रॅफिक सिग्नलची गरज असल्याने सिग्नलची मागणी केली . त्यानुसार चार सिग्नल मिळाले. त्यापैकी तीन मुख्य ठिकाणी सिग्नल लागले असून, पीडब्ल्यूडीने नवाथे चौकात जागा न दिल्याने तेथे सिग्नल उभारले नाही. साबाविच्या अधीक्षक अभियंत्यांची भेटीनंतर . त्यांच्या आश्वासनानुसार तेथेही सिग्नल लागणार. रिता उईके, वाहतूक पोलिस निरीक्षक.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)