राजपाल यादव, रेमो डिसुझानंतर कॉमेडियन कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी आली आहे. आरोपीने ई-मेलद्वारे कपिलसह त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, ओळखीचे आणि शेजाऱ्यांना मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
ई-मेलचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानमधील असल्याचे कळते. धमकी प्रकरणी कपिल शर्माकडून अद्याप स्टेटमेंट आलं नाही.
कपिलच्या आधी अभिनेता राजपाल यादव, रेमो डिसुझा आणि सुगंधा मिश्रा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याचे नाव विष्णु असल्याचे कळते. मुंबई पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.