दि. 22 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास लखनऊ वरून मुंबईला जाणारी पुष्पक एक्सप्रेस मध्ये पाचोरा तालुक्यातील परधाडे या गावाजवळ आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी गाडीतून उतरून दुसरीकडे जात असताना दुसऱ्या रोडवर आलेल्या न्यू दिल्ली बंगलोर एक्सप्रेसच्या खाली आल्यामुळे 13 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हे सर्व मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे आणण्यात आले. सायंकाळी सहा वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत शवगृहामध्ये महिला डॉक्टरांनी आपले कर्तव्य पार पाडले.
या अपघातात मृत झालेल्या प्रवाशांची अवस्था अत्यंत दयनीय होती. काही जणांचे तर धड वेगळे, शीर वेगळे होते. काहींचा चेहरा होता परंतु ओळख पटत नव्हती अशा अवस्थेतही महिला डॉक्टरांनी आपले कर्तव्य पार पाडले. शव विच्छेदन करणे, त्यांचे डीएनए ही तपासणी कोणाचे धड कोणाचे बॉडी बरोबर आहे याची सुद्धा तपासणी त्यांनी केली.
यामध्ये आर एम ओ डॉक्टर सुशांत निकुंभ, डॉक्टर चंद्रमोहन हरणे होते तर डॉक्टर करिष्मा सोनवणे, डॉक्टर स्वाती सिन्हा, डॉक्टर सोनल बोरोले, डॉक्टर नीता पवार हे गेल्या 24 तासापासून हे सर्व मृतदेहांचे शवविच्छेदनापासून तर केमिकल लावून ते मृतदेह त्यांच्या निश्चित ठिकाणी नेण्यासाठी मदत करीत आहेत.
तर 23 रोजी डॉक्टर करिष्मा सोनवणे, डॉक्टर स्वाती सिन्हा, डॉक्टर सोनल बोरोले, डॉक्टर नीता पवार या सर्व महिला वर्गाने सकाळी सहा वाजेपासून तर दुपारी पर्यंत 12 मृतदेहांचं शवविच्छेदन केले. यामध्ये रेल्वे अपघातातील 7 मृतदेह सह रोड अपघातातील दोन आत्महत्या केलेल्या दोन तर विष प्रसाधन केलेली एक असे मृतदेह होते. तर यांना पवन जाधव, राज जाधव यांनी शविच्छेदनामध्ये मदत केली.
तर अपघात झाल्यापासून सेवाविच्छेदनगृहामध्ये हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे, पीसी ईश्वर खवडे, कैलास शिंदे, सचिन देशमुख, सिद्धार्थ सुरवाडे, प्रशांत शेंगदाणे यांनी पंचनामे करण्यापासून ते मृतदेहाची सर्व कागदपत्रे व शासकीय पूर्तता करण्याचे कामकाज अहोरात्र सुरू आहे.