अमरावतीच्या बहिरम यात्रेत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाड्याच्य या शंकरपटात राज्यभरातील बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी देखील यात्रेत सहभाग घेतला होता.त्यांनी बैलगाडी चालवून अवघ्या 6.99 सेकंदात मारली बाजी मारली आहे. यावेळी त्यांनी मला पाडण्याची कुणाची औकात नाही.तुम्ही बेईमानी केली म्हणून मी हरलो, हे मताचे चोर आहेत साले अशी टीका यावेळी बच्चू कडू केली आहे.
विदर्भातील सर्वात मोठी बहिरम यात्रा अमरावतीत भरली आहे. या यात्रेत बैलगाडाशर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त माजी मंत्री बच्चू कडू यांनी भव्य शंकरपटाचं आयोजन केल होते. या प्रसंगी आमदार बच्चू कडू यांनी स्वतः बैलजोडी घेऊन शंकरपटात सहभागी होऊन अगदी धूरकरी प्रमाणे अवघ्या 6.99 सेकंदात पल्ला गाठला.बच्चू कडू यांनी अतिशय सुसाट वेगाने धुरकरीपेक्षा वेगाने बैलजोडी हाकली. बच्चू कडू यांच्या बैलगाडीने अवघ्या काही सेकंदातच शर्यतीचा पल्ला गाठला. बच्चू कडू यांनी अवघ्या 6.99 सेकंदात बाजी मारलेली पाहून गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.
हे सुद्धा वाचा
शेतकऱ्यांच्या मुलाची छाती आहे
बच्चू कडू यांनी यावेळी गावकऱ्यासमोर छोटे खाणी भाषण केले, ही 56 इंचाची छाती नाही तर शेतकऱ्यांच्या मुलाची छाती आहे.बैल जोडी आवरत नव्हती इतकी सुसाट पळाली आहे.हम चलते तो चिता की रफ्तार से चलते… रोकने की तुम्हारी औकात नही थी. तुम्ही बेइमानी केली म्हणून मी हरलो, हे मताचे चोर आहे तर बच्चू कडू थांबत नाही आणखी ताकतीने आम्ही धावणार शेतकरी आणि शेतमजुरांसाठी आम्ही लढतोय.. तर आमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब या शेतकऱ्यांसाठी आहे असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले