कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांनी हिवाळ्यात स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, विषाणूजन्य ताप अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. आहारातील जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता राहू देऊ नका.
पोषणतज्ञ नमामि अग्रवाल म्हणतात की काही लोक व्हिटॅमिनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी मल्टी व्हिटॅमिनच्या सप्लीमेंट्स घेणे सुरू करतात. पण मल्टी व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही सुपचा समावेश करू शकता. कोणते सूप प्यायल्याने व्हिटॅमिनची कमतरता होत नाही ते तज्ञांकडून जाणून घेऊ.
पालक आणि मक्याचे सूप
पालक आणि मक्याच्या सूप मध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के मुबलक प्रमाणात असते. हे रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. त्यासोबतच मक्यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आढळतात ते पचन सुधारण्यास मदत करतात. त्यासोबतच पालकमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
गाजर आणि बिटचे सूप
बिटमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. त्यासोबतच गाजरमध्ये व्हिटॅमिन ए असते जे त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर मानल्या जाते. बिट आणि गाजरचे सूप प्यायल्याने रक्ताभिसरणही वाढते. यामुळे जीवनसत्वाची कमतरता भासत नाही.
मुगाच्या डाळीचे सूप
मूग डाळीमध्ये प्रथिने आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. हे स्नायूंना बळकट करण्याचे काम करते. हे सूप व्हिटॅमिन बी 9 ची कमतरता देखील दूर करते. मूग डाळीमध्ये फायबर आढळते. हे पचन आणि बद्धकोष्ठते संबंधित समस्या दूर करते. त्यात कमी कॅलरी असते. यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते.
हे तीन सूप पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जाते. हिवाळ्यात हे सूप पिल्याने सर्दी, खोकल्यापासून बचाव होतो आणि मल्टी वितमिंची शरीरात कमतरता असल्यास ती देखील पूर्ण होते. लहान मुलांना हिवाळ्यात हे सूप अवश्य दिले पाहिजे. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि सर्दी खोकल्या सारख्या सामान्य आजारापासून त्यांचा बचाव होईल.