Dattatray Bharane Volleyball Playing Video : राज्याचे क्रीडामंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. दत्तात्रय भरणे यांनी नुकतंच पुणे जिल्ह्यातील एका क्रीडाप्रसंगी व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला. मात्र व्हॉलीबॉल खेळत असताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली जमिनीवर कोसळले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी दत्तात्रय भरणे यांना दुखापत झाली आहे. मात्र सुदैवाने यात ते थोडक्यात बचावले.
पुण्याच्या मावळमध्ये एका महाविद्यालयातील क्रीडा संकुलाचे उद्घाटन पार पडले. या क्रीडा संकुलाचे उद्धाटन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी अनेक खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांनी विविध खेळ खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी क्रीडा मंत्र्यांनाही खेळ खेळण्याचा मोह आवरला नाही अन् त्या मोहापायी ते चक्क व्हॉलिबॉल खेळण्यासाठी चक्क मैदानात उतरले. याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले.
दत्तात्रय भरणेंनी घेतला व्हॉलिबॉल खेळण्याचा आनंद
या व्हिडीओत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे व्हॉलिबॉल खेळण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. सुरुवातीला दत्तात्रय भरणेंनी व्हॉलिबॉल योग्यरित्या टोलावला. त्यानंतर समोरच्या टीमने व्हॉलिबॉल टोलवला. हा व्हॉलिबॉल नेटच्या पुढं आला आणि त्यावेळी दत्तात्रय भरणे हे तो व्हॉलिबॉल टोलवण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. यात त्यांना मुक्का मार लागला.
जो पडतो तोच सावरतो, दत्तात्रय भरणेंचे वक्तव्य
यावेळी डोक्याला दुखापत होण्यापासून ते थोडक्यात बचावले. व्हॉलिबॉल खेळत असताना त्यांचा तोल गेला. ते पडत असताना त्यांचं डोकं लोखंडी पोलवर आपटण्याची शक्यता होती. मात्र, लोखंडी पोलवर धडकण्याच्या आधी त्यांनी स्वत:ला सावरलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र त्यांना मुक्का मार लागल्याची कबुली त्यांनी जाहीरपणे दिली. तसेच राजकारणात 2014 साली पडलो, पुन्हा 2019 ला राज्यमंत्री झालो आणि आत्ता कॅबिनेट मंत्री झालो, जो पडतो तोच सावरतो असे वक्तव्य दत्ता भरणे यांनी केले.