Published on
:
23 Jan 2025, 8:48 pm
Updated on
:
23 Jan 2025, 8:48 pm
नागपूर : 'बडे मियां तो बडे मियां छोटे मियां सुभान अल्ला’ असे म्हणत पद्मभूषण, पद्मश्री उदित नारायण यांना आदित्य नारायण यांनी आदरपूर्वक स्टेजवर आमंत्रित केले आणि लगेच सदाबहार असे ‘पापा कहते है’ गाणे बाप-बेट्याने सादर करीत रामटेक महोत्सवाचा मंच गाजवला.
रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसरा दिवशी पद्मभूषण, पद्मश्री उदित नारायण यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ आयोजित करण्यात आली. उदित नारायण , आदित्य नारायण यांच्या जोडीने आपल्या सुमधूर आवाजातील जुन्या व नवीन गीतांनी रामटेककरांना भूरळ घातली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 'शायद कभी न कह सकु', तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे’, ‘केसरिया मेरा इश्क’ वर तरुणाईने साथ दिली. ९० च्या दशकातील 'आना ही पडा सजना' वादा रहा सनम, रामजी की चाल देखो अशी विविध गाणी सादर करीत रामटेककरांची मने जिंकली.
पुष्पाभाऊ आणि ऐश्वर्या सहाने केले मनोरंजन
लोकप्रिय 'पुष्पा' चित्रपटातील संवाद आणि गाणी यावर आधारित स्किटने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर सारेगमप फेम गायिका ऐश्वर्या सहा यांनी त्यांनी आपल्या सादरीकरणाने सुरेल मेजवानी दिली. जरा जरा महाकता है, मेरे ख्वाबो मे जो आये, अशी सदाबहार गाणी तिने सादर केली. ढोलताशा पथक, आदिवासी नृत्यानेही मजा आणली. या तीन दिवसीय महोत्सवात मुख्य कार्यक्रमांव्यतिरिक्त स्थानिकांसाठी रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, सायकल स्पर्धा, पॅरामोटर, मातीकला स्पर्धा, नौका स्पर्धा, स्केटिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. उद्या 24 जानेवारी रोजी समारोप ‘छय्या छय्या’ फेम सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ने होणार आहे.